पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खेळकर खेळघर


 पूर्व प्राथमिक शिक्षण खरं तर सर्वाधिक महत्त्वाचे. पण भारतात त्याची सर्वाधिक उपेक्षाच झाली. एकविसाव्या शतकातील भारतातील शिक्षणाची आपणास पुनर्रचना करायची असेल तर त्याची सुरुवात आपण बालवाडीपासूनच करायला हवी. जगातील अनेक देशात पूर्व प्राथमिक शिक्षण परिषदा असतात. ती परिषद पूर्व प्राथमिक शिक्षणाचा धोरण, अभ्यासक्रम, वय, शिक्षक पात्रता, बालवाडीचा अपेक्षित दर्जा, किमान सुविधा, मनुष्यबळ, साधने, अध्यापन पद्धती, कालबद्ध बदल, शिक्षक प्रशिक्षण, पालक भूमिका, शासन सहभाग, मानांकन, कालावधी, सर्व बाजूनी विचार करत असते. इतकेच नव्हे, तर बालशिक्षण, बालमानसशास्त्र, बालआरोग्य, बालआहार, बालरंजन, बालसाहित्य असा फेर धरत सतत संशोधन, संवाद, समाज सहभाग, चर्चा, परिषदा घेत बालशिक्षण नित्य विकसित करत असते. या संदर्भात अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांताचे कार्य समजून घेतले पाहिजे.
 बाल शिक्षणाचा विचार बाल विकासाच्या पायावर उभा असला पाहिजे. म्हणजे बाल विकासाच्या आपल्या जाणिवा प्रगल्भ हव्यात. बालकांच्या सामाजिक व भावनिक स्थिती व गरजांचे आपणास भान हवे. त्यांच्या बौद्धिक विकासाच्या मर्यादांची माहिती हवी, शारीरिक विकास कसा होत राहतो याचं निरीक्षण हवं. भाषा, अंक, अक्षर, खेळ, संघभाव, स्वभाव साऱ्यांच भान ठेवत बालवाडीतील शिक्षक-विद्यार्थी संबंध व स्नेहभावाचा गोफ विणत राहायला हवा. शिक्षक-विद्यार्थ्यांत मातृबंध हवेत. विद्यार्थी आवड व वृत्ती लक्षात घेऊन शिक्षकांनी आपली भूमिका, व्यक्तिमत्त्व विकसित ठेवण्याकडे निरंतर लक्ष ठेवायला हवे. त्यांचा कल

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७