पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वकोश (वीस खंड) हवेच. शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दकोश, वाक्प्रचार कोश, म्हणी कोश, पर्यायी शब्दकोश, समानार्थी शब्दकोश हवेच. इंटरनेट घेतले की हे सर्व ज्ञानभांडार फुकट घरी येते. तुमचा मोबाइल आता अँड्रॉइड हवा. त्यावर ई-बुक्स, क्लिप्स, व्हॉटस् ऍप हवेच. कॅमेरा, शूटर, टेपरेकॉर्डर आपोआप येतोच. ही चैन नव्हे. ही नव्या शिक्षकाची नवी साधनसंपन्नता आहे. त्याचा कल्पक वापर, वाचन, अध्ययन, अध्यापनात शिक्षक करेल तर वर्गात माहितीचा महापूर व ज्ञानाचा धबधबा वाहिल्याशिवाय राहणार नाही. तो थ्रीडी व व्हर्च्युअलचा साक्षर असेल तर तो समकालीन अद्ययावत, आधुनिक शिक्षक, समजावा. शैक्षणिक साधने कोण्या एका भाषा, ज्ञानशाखेची नसतात. ती सर्वज्ञानी व सर्वज्ञानवाहक असतात.


 मराठीमध्ये संक्षिप्त वाङ्मय कोश (भाग १,२) 'वाङ्मयीन संकल्पना कोश', 'संकल्पना कोश' (भाग १ ते ५), 'यांनी घडवले सहस्रक', 'राजभाषा', 'संविधान', 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली सर्व प्रकाशने', 'लोकराज्य', 'लोकप्रभा', 'पालकनीती मासिकांचे वाचन विशेषांक', 'वाचणाऱ्याची रोजनिशी' सारखे पुस्तक, साहित्य अकादमी, भारतीय ज्ञानपीठ, नोबेल पुरस्कृत साहित्य कृती, वेळोवेळी प्रकाशित शैक्षणिक अहवाल (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय) शिक्षकांनी मिळवून वाचलेच पाहिजेत. रोजच्या खर्चात बचत, काटकसर करून खरेदी केली पाहिजे. सर्व शिक्षक हे आपल्या गावाच्या सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयाचे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६४