पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(static) माहिती असायची. आता ती चल (Dynamic) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली असून उपयोग करणारा त्यात भर घालू शकतो, दुरुस्ती करू शकतो, अनावश्यक भाग गाळू शकतो. ज्ञान, अध्ययन करण्याची ही पद्धती. इथे तुम्ही स्वत:चा कस सिद्ध करू शकता. 'वॉलविशर' (Wallwisher) (http://www.lessonpaths.com/learn/i/using-online-sticky-notes/ wallwishercom-login) वेलविशर नव्हे वॉलविशर... म्हणजे आभासी वृत्त मंच (Virtual Bulletine Board) प्रकाशित करू शकता, जे क्षणार्धात जगभर प्रसिद्ध होते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद घडवून आणणारे संकेत स्थळ म्हणून 'टायटन पॅड' (Titan Pad) (https://titanpad.com) ओळखले जाते. जगातल्या कोपऱ्यातल्या कुणाही विद्यार्थ्याला कोणतीही शंका असेल तर त्याने इथे मांडायची.... जगातल्या दुसऱ्या कोपऱ्यातला शिक्षक ती दूर करतो... इंटरनेटवरचा हा मोफत शिकवणी वर्गच म्हणा ना! 'स्काईप' (Skype) (https://www.skype.com) म्हणजे जगात माहीत असलेल्या व्यक्तीशी दृक्-श्राव्य संवादाचे मोफत साधन. माणूस समुद्रात असू दे की, अवकाशात आपण या साधनाने, सुविधेमुळे परस्परांना पाहून, दाखवून एकमेकांसमोर बोलतो आहोत असा संवाद. म्हणजे प्रत्यक्ष समोर नसताही समोर बसून शिकल्यासारखेच. 'विबे' (Weeby) हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा आभासी संघ वा मंच होय. 'विकीस्पेस' (wikispace) (https://www.wikispace.com/) मध्ये आपण 'विकिपीडिया' च्या विविध माहितींच्या लिंक्स संग्रहित करून हव्या तेव्हा वापरू शकतो. शिकण्या शिकवण्याची शतकाची नवी, ऑनलाईन साधने म्हणजे नवे शिक्षण विश्व. ते नव्या शिक्षकांना माहीत होईल तो शिक्षक सलमान खानसारखा विश्वशिक्षक होईल.
 मी उल्लेख केलेला सलमान खान हा हिंदी चित्रपट सृष्टीतला नट नसून इंटरनेटवरचा जगप्रसिद्ध शिक्षक आहे. इंटरनेटवर त्याची खान ऍकॅडमी नावाची संस्था आहे. हा जगप्रसिद्ध अमेरिकन शिक्षक असून बिल गेटस् यांनी त्याचं कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर 'यू ट्यूब' वर त्याचे शिक्षणाचे धडे, पाठ गिरवणारे १५ लाख सभासद आहेत. नादिया नावाच्या आपल्या चुलत बहिणीला शिकवायचे म्हणून तो ऑनलाईन शिकवू लागला.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५८