पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धोरण कशाचाही विचार न करता. आता न्यायमूर्ती वर्मा आयोगानं आपला अहवाल सादर केला असून तो स्वीकारण्यात आला असून सध्या कालबद्ध कृती कार्यक्रमाचा धूमधडाका सुरू आहे. त्या अहवालाचे नाव आहे 'Vision of Teacher Education in India, Quality and Regulatory Perspective.' अहवालाच्या शीर्षकातूनच हे स्पष्ट होतेय की, भारतातले वर्तमान अध्यापक शिक्षण (Teacher Education) गुणवत्ताप्रधान नाही व त्यावर कुणाचे नियंत्रणही नाही. या आयोगाच्या सर्व शिफारशी तंतोतंत लागू झाल्या तरी भारतातील शिक्षक प्रशिक्षण, पात्रता, गुणवत्तेत आमूलाग्र बदल होतील असे दिसत नाही, कारण यंत्रणेत कालभानाचा अभाव आहे.
 जग सध्या विद्यार्थी व शिक्षकांच्यामध्ये असलेली दरी रुंदावत असल्याबद्दल काळजीत आहे. वर्तमान माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे. संगणक, इंटरनेट, मोबाईल, टॅबज्, आयपॅडस्, व्हिडिओ क्लिप्स, एल. सी. डी., डी. ए. पी. प्रोजेक्टर, लेसर प्रिंटींग, मल्टिमिडिया, व्हिडिओ गेम्स घेऊन जन्मलेली व त्यातच वाढत असलेली विद्यार्थ्यांची नवी पिढी. सरासरी २०,००० तास टी. व्ही. पाहणारी, १०,००० व्हिडिओ गेम खेळणारी व फक्त ५०० तास वाचणारी. डिजिटल गेमवर आधारित शिक्षणाचे पाठ लिहिणारा एक शिक्षक, साहित्यिक आहे. मार्क प्रेन्सी त्याचे नाव. त्याने विद्यार्थ्यांच्या या नव्या पिढीचे वर्णन 'डिजिटल नेटिव्ह' केले आहे. ही पिढी संगणकाची भाषा बोलते, वापरते, व्यवहार करते. तिला

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४७