पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकच असायला हवा. तो कोणत्याही क्षणी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष (फोन, मोबाईल, ई-मेल, चॅट, व्हिडिओ, स्काईपवर) उपलब्ध हवा.
 बहुभाषी, बहुदेशी शिक्षक विश्वशिक्षक म्हणूनही तो हवा. नव शिक्षक सर्व ज्ञानी, आंतरविद्याशाखांचे भान असणारा हवा. विद्यार्थी समाजाच्या दृष्टीने प्रतिदर्श (Role Model) असणारा शिक्षक हवा. नव्या शिक्षकाचे चित्र, चरित्र, चारित्र्य, सदाचारी व सदाशयी हवा. त्याचा नवीन व्यवहार भेदातीत, समानशील, निरपेक्ष हवा. तो विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक हवा. रोजचे शिक्षण चैतन्यशील बनवणारा शिक्षक नवोन्मेषी हवा. विश्वभान असलेला शिक्षक कुपमंडूक राहूच शकत नाही. जग खेडे होत असतानाच्या काळातला नवा शिक्षक एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारा, तंत्रज्ञान कुशल, संशोधक हवा. जगायच्या ज्ञानापेक्षा प्राप्त ज्ञानाचे उपयोजन शिकवणारा शिक्षक संभावनांचे आकाश कवेत घेत भविष्यलक्ष्यी अध्ययन, अध्यापन, करत असतो. तो शिक्षक खरा नवा शिक्षक !

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४५