पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्रज्ञ हवा. त्याची स्वत:ची दृष्टी, मत हवं. तो साधन संपन्न हवा. त्याची पाठ्यपुस्तके, कोश, संदर्भग्रंथ, संगणक, पेनड्राईव्ह स्वत:चे हवे. आपल्या पगारातील काही वाटा त्याने शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास, साधन समृद्धी, अभ्यास, संशोधन, पर्यटन यावर खर्च करायला हवा. समाजाचे त्याचे अभिन्न नाते हवे. सामाजिक प्रश्नात त्याची भूमिका व सहभाग असायला हवा. नवा शिक्षक विद्यार्थी वेल्हाळ हवा. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त तो विद्यार्थ्यांसाठी काय करतो ही त्याच्या बांधिलकीची खरी कसोटी. शिकवणीस छेद देत शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा शिक्षक हवा. त्याचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न हवे. पोशाख नेटका हवा. बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा वृत्ती विकास जपणारा शिक्षक हवा. प्रेमळ, मृदुभाषी, मनमिळाऊ, तन्मयतेने शिकवणारा, रोज स्वाध्याय करणारा (अध्यापनाची पूर्वतयारी, चिंतन, मनन, साधन निर्मिती, संग्रह, भेटी, प्रकल्प इत्यादी) शिक्षक हवा. सुवाच्य व शुद्ध हस्ताक्षर, निर्दोष अध्ययन, वक्तृत्व, नाटकीयता, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, संगीत व्यासंगी शिक्षक हवा. कालमान हे नव्या शिक्षकाचे व्यवच्छेदक लक्षण. तो संगणक साक्षर हवाच. धर्म, जात, पक्ष, पंथ निरपेक्ष शिक्षक हवा. विज्ञाननिष्ठा, नैतिक, आदर्श, मूल्य जपणारा शिक्षक नवा. नवा शिक्षक तन, मन, धन समर्पित सातही दिवस चोवीस तास (७*२४)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४४