पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्या शिक्षकाची संकल्पना


 अंगणवाडी शिक्षिका ते विद्यापीठाचे कुलगुरू असा व्यापक शिक्षक माझ्यापुढे आहे. स्त्री-पुरुष, खासगी, शासकीय, निमशासकीय, शिक्षक सेवक, तासिका तत्त्वावरील महाविद्यालयीन अधिव्याख्याते, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थशासित संस्थांत येऊ घातलेले शिक्षक, जिल्हा परिषद, नगरपरिषदांतील प्राथमिक शिक्षक सर्व आहेत. नवा शिक्षक सर्व थरातला, वर्गातला नवा झाला तरच शिक्षण नवे होणार.
 केशवसुतांची 'नवा शिपाई' कविता कितीतरी दिवस माझ्या मनात घर करून आहे, तसा 'नवा शिक्षक' पण. 'नवा शिपाई' धर्तीवर मी 'नवा शिक्षक' कविताही लिहिली आहे. तो या लेखनामागचा भावपक्ष होय. भौतिक वास्तव मात्र वर्तमान आहे. ती या लेखाच्या शेवटी दिली आहे. गेल्या तपभराच्या काळात जगात, भारतात, महाराष्ट्रात मोठे बदल होत आहेत. जगातील शिक्षणाबाबत युनेस्को, युरोपियन युनियन, सार्क अशा विविध संघटना जागतिक, उपखंडीय शिक्षणाबाबत सतत विचारविनिमय, चर्चासत्रे, परिषदा, अहवाल असे रिंगण काळाच्या अपेक्षा व आवाहनांची सांगड घालत शिक्षणात नवे बदल सुचवत शिक्षकाची नवी भूमिका निश्चित करत असतात. त्या अनुषंगाने उपखंड, राष्ट्र, राज्य असे ते बदल पाझरत राहतात.
 'शाश्वत विकासार्थ शिक्षण' असं ब्रीद घेऊन युनेस्कोने गेली दहा वर्षे सतत जागतिक शिक्षणाचा विचार केला आहे. या दशकापूर्वी १० ते १२ नोव्हेंबर, २०१४ ला युनेस्को जपान सरकारच्या सहकार्याने आबायामा येथे जागतिक शिक्षण परिषद योजत आहे. 'Learning Today for sustainable

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४१