पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शी खेळतात, 'गुगल' नी त्यांना केवळ आवाजी कमांडवर (Voice Mail /App) वर जगाचे ज्ञानाचे महाद्वार उघडे केले आहे, ही पिढी लिहीत नाही, सरळ टंकित (Type) करते. तिला संगणक, मोबाईल, रिमोटच्या सर्व कमांड, इनपुट, आऊटपुट, डिलीट, डाऊनलोड, कट, पेस्ट, फॉर्वर्ड, मॅसेजिंग, सेंड, सारे न शिकवता येते. ते सारे खेळ व्हर्च्युअल खेळत व्हर्च्युअल जगाचे नागरिक होतात.
 दुसरीकडे हे सारे उघड्या डोळ्यानी पाहणारे शिक्षण नियोजक, धोरणकर्ते, कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षक मात्र बदलायला तयार नाहीत. ई-बुकच्या जमान्यात अजून ते कागदी पाठ्यपुस्तकातच रमून आहेत. अजून ग्रंथालयात ई-बुक्स, ई-जर्नल नगण्य आहेत. शिक्षक, प्राध्यापकांना स्वत:चा मोबाईल शैक्षणिक साधन म्हणून वापरावा वाटत नाही. एकट्या मोबाईलने हजेरी घेणे, रजा चिठ्ठी, गृहपाठ देणे, ऑडिओ, व्हिडिओ क्लिपद्वारे अध्यापन, व्हॉटस् ऍपद्वारे शंका निरसन सारखी शैक्षणिक कार्ये करणे शक्य असताना, ते करताना दिसत नाही. स्मार्ट बोर्ड आला तरी आपण ब्लॅक बोर्डमध्येच अडकून आहोत. एलसीडी प्रोजेक्टर असून आपण शिकवतो तोंडीच. प्रकल्प, सर्वेक्षण, जर्नल, गटचर्चा, स्वयंअध्यापन, सहविद्यार्थी अध्यापन अशा नव तंत्राचा अपवाद वापर आपल्या शैक्षणिक अनास्थेचे लक्षण होय.
 संगणक, इंटरनेट, उपग्रह, ऍप्स्, क्लिप्स, ब्लॉग्ज, वेबसाईट, लिंक्स, युट्यूब, विकीपीडिया, ऑनलाईन भाषा, विज्ञान सॉफ्टवेअर आपण वापरू बघत नाही. इंटरनेटवर इतकी शैक्षणिक साधने आहेत की 'Chalk and Talk' च्या जागी 'Plug and Chug' चा काळ आलाय हे आपण आचरणात आणत नाही. कॉम्प्युटर लॅब, लँग्वेज लॅब, टच स्क्रीन बोर्ड (स्मार्ट बोर्ड), स्मार्ट क्लास, थ्री डी क्लास या काही अशक्य गोष्टी नव्हेत. 'डिगो', 'ग्लॉगस्टर', 'प्रेझी', 'ड्रॉपबॉक्स', 'एव्हरनोट', 'वॉलविशर', 'टायटन पॅड', 'स्कायपी', 'विबे', 'विकीस्पेस' सारखी असंख्य साधने मोफत डाऊनलोड करून दैनंदिन अध्यापन अधिक प्रभावी रंजक करणे शक्य आहे. फार नाही पण किमान संगणक साक्षरता व त्याचा दैनंदिन उपयोग शिक्षकांना अनिवार्य व आकर्षक वाटायला हवा, गरजेचा वाटायला हवा. टू व्हिलर, फोर व्हिलर गरजेचीच, पण लॅपटॉप व इंटरनेटही अनिवार्य मानून शिक्षक, स्वत:ला आधुनिक बनवतील, तरच ते जागतिकीकरण, खासगीकरण, विदेशी शिक्षण इत्यादी आव्हानांचा प्रतिकार करू शकतील.
 जगात हार्वर्ड विद्यापीठा इतकेच खान ऍकॅडमीचे महत्त्व आहे. या ऍकॅडमीचा प्रमुख सल खान हा केवळ अध्यापनातील नव तंत्रज्ञानाचा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१२९