पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवे शिक्षण : जग आणि भारत


 जगभरचा मानव समाज जागतिकीकरणाच्या प्रभावात आहे. त्यातून शिक्षण सुटलेले नाही. माहिती, तंत्रज्ञान, माध्यमे, संपर्क साधने यांनी स्थळ, काळ, अंतर, गती इत्यादी शब्द पुसून टाकले आहे. परिणामी जीवनाच्या विविध क्षेत्रांतील स्थानिक स्थितीची जागा जागतिक रूप धारण करत आहे, नवी पिढी उपजत जागतिक समुदायाची सदस्य बनते आहे. त्यामुळे शिक्षण जगभर एका स्वरूपाचे होण्या-करण्याकडे जगाचा कल आहे, जागतिक शिक्षण वैश्विक एकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातून जगातले देश विविध कारणांसाठी एकमेकावर अवलंबून राहात आहेत, एकेकाळी देशांचा विकास हा स्वयंपूर्णतेवर अवलंबून असायचा. आता आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर जग जिंकण्याची जीवघेणी स्पर्धा सार्वत्रिक झाली आहे. माणूसही तसाच घडतो, विकसित होतो आहे, एका अर्थाने भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षणाचेही जागतिक रूप विकसित होते आहे. त्यात स्थानिक भाषा, साहित्य, संस्कृतीचा विलय व विसर्जन गतिमान होत आहे. सामाजिक न्याय, मानवाधिकार, पर्यावरण, शिक्षण, संस्कृतीची जागतिक परिमाणे (Standards) निश्चित होत आहेत, शाश्वत विकास व शांतीसाठी शिक्षण हे वर्तमान शतकातील शिक्षणाचे अघोषित ब्रीद बनले आहे. सकारात्मक मूल्यांना व जीवनशैलीला महत्त्व येत आहे, मनुष्य विश्व नागरिक बनण्याच्या प्रक्रियेत स्थानिक व देशीय वैशिष्ट्यांच्या जागी उन्नत वैश्विक परिमाणे रूढ होत असल्याने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल भारतीय समाज ध्वनी व प्रकाशाच्या वेगाने आणि भूमितीच्या पटीने आत्मसात करत आहे. भारतीय जीवनात शिक्षण ही

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११०