पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवा शिक्षक


 नव्या युगाचा, नव्या तंत्राचा, समर्पित शिक्षक मी आहे,
 कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे !
 जात नाही, धर्म नाही, न मी एक पक्षाचा
 तेच संकोची जे आखडती प्रदेश समग्रतेचा !
 अनंत माझी ज्ञानलिप्सा
 अल्पाने न मला कधी समाधान
 विश्व कवेत घेण्याचेच मला नित्य अवधान
 शाळेस माझ्या कुलूप असणे कधी न मला साहे !
 कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे !
 जिकडे तिकडे माझेच विद्यार्थी आहेत
 सर्वत्र सावल्या माझ्या मला दिसताहेत
 जग असे माझी मातृभूमी
 अवकाश माझी स्वप्नभूमी असे
 उद्याची उद्यमी पिढी माझी
 मला नित्य खुणावते आहे
 विद्यार्थी माझे, मी त्यांचा
 एकच ध्येय आम्हातुनि वाहे !
 नव्या ध्यासाचा, नव्या श्वासाचा, नवा शिक्षक मी आहे !

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१३