पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८. सेवापूर्व प्रशिक्षणात आमूलाग्र बदल सर्व स्तरावर करण्यात येऊन प्रशिक्षण पाठ्यक्रम (बी. एड., बी. एड., एम. एड., एम. फिल, पीएच. डी., नेट, सेट इ.) माहिती तंत्रज्ञान, संगणक, संपर्क क्रांती, तंत्रज्ञान इ. चे अवधान ठेवून बनवावेत व प्रतिवर्षी ते अद्यतन (अपग्रेड) करण्यात यावेत.
 ९. बालवाडी ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षण स्वायत्त व स्वतंत्र (न्याय व्यवस्थेप्रमाणे) करावे. त्याचे नियमन, नियंत्रण, नियोजन, शिक्षण तज्ज्ञांकडे द्यावे.
 १०. शिक्षकास विकास, संशोधन संधीचे, प्रयोगाचे स्वातंत्र्य देऊन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रतिवर्षी सुधारित करावे. (रिव्हाइज्ड)
 ११. प्रशिक्षण, प्रवेश, पदभरती, पदोन्नती, नियुक्ती सर्व स्तरावर देणगी घेणे अपराध ठरवण्याचा कायदा करावा. त्यासाठी अध्यादेश काढावा.
 १२. शिक्षकांनी आपली गुणवत्ता वाढवावी, टिकवावी म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकारी/विद्यापीठ स्तरावर प्रतिवर्षी बहुस्तरीय फिडबॅक व मूल्यांकन पद्धती लागू करावी.
 १३. शिक्षक वृत्ती विकासार्थ शैक्षणिक साधन खरेदी, संशोधन प्रकल्प, प्रकाशन, प्रयोग इत्यादीसाठी अनुदान दिले जावे. जे बालवाडी ते विद्यापीठ सर्व शिक्षणस्तरावर दिले जावे.
 १४. शिक्षण संस्था संहिता, अनुदान संहिता सेवाशर्ती संहिता सर्व शिक्षण संस्थांना समानपणे लागू करून शिक्षणाचा अपेक्षित दर्जा (डिझायरेबल स्टँडर्ड) निश्चित केला जावा. त्याच्या निरीक्षण, नियंत्रण, विकासाची स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
 १५. 'शिक्षण प्रथम' (Education First) चे धोरण अंगीकारून केंद्र व राज्यस्तरावर नियोजन, तरतूद, अंमलबजावणी सर्व स्तरावर शिक्षण व शिक्षक विकासास प्राधान्य देण्यात यावे.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०२