पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षक विकास : शोध आणि बोध


 विद्यार्थी व समाजाच्या मनात शिक्षकांबद्दल जो आदर असतो तो व्यक्त करणारी एक सुंदर कथा हिंदीत आहे. कथासम्राट प्रेमचंदांनी लिहिलेल्या या गोष्टीचं नाव आहे 'बोध' पंडित चंद्रधर शिक्षक असतात. ते या कथेचे नायक. ते प्राथमिक शाळेतले गुरुजी. आपण या व्यवसायात आल्याचा त्यांना नेहमी पश्चात्ताप असायचा. त्यांना अवघा पंधरा रुपये पगार होता. न पोटभर अन्न मिळायचे, अंगभर कपडा भेटायचा. त्यांच्या शेजारी राहणारे ठाकूर अतिबलसिंह व मुन्शी बैजनाथ त्यांचे मित्र होते. ते तिघे मिळून एकदा अयोध्येच्या यात्रेस निघतात. प्रवासात रेल्वेमध्ये त्यांना एक प्रवासी भेटतो. तो पोलीस असलेल्या ठाकूर अतिबल सिंहाला आपल्या मित्राच्या मदतीने सामानासह गाडीतून प्लॅटफॉर्मवर एवढ्याचसाठी ढकलून फेकतो कारण त्या पोलिसाने त्या दोघांशी असाच व्यवहार केलेला असतो. प्रवासात दुस-या मित्रास मुन्शी बैजनाथला ताप, उलटी, जुलाबांनी इतके हैराण केले की, त्यांना प्रवास सोडून डॉक्टरांकडे जाणे भाग पडते. मुन्शी बैजनाथला ज्या डॉक्टरांकडे घेऊन जातात तो मुन्शीला ओळखत असतो. तो मोठी फी आकारून उपचारास तयार होतो. बैजनाथकडे तेवढे पैसे नसतात. ओळख असून एवढे पैसे आकारल्याचे मुन्शीला आश्चर्य वाटते. तो विचारतो, "इतके पैसे कसे ?" डॉक्टर उत्तर देतात की, "तुम्ही सातबारा कितीचा असतो अन् घेता किती तसेच!" शेवटी ते अयोध्येस अपरात्री पोहोचतात. सर्व पंड्यांची (ब्राह्मणांची) घरे भरलेली असतात म्हणून त्यांना नदीकाठी झाडाखाली थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागते. रात्री अचानक एक गृहस्थ तिकडून कंदील घेऊन जात असतात. या तिघांना पाहतात. पैकी ते पंडित चंद्रधरांना ओळखतात. तो असतो कृपाशंकर गुरुजींचा विद्यार्थी. तो

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९७