पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देखरेखीखाली कार्यानुभव घेणे बंधनकारक असते. नंतर सहा महिने तुम्ही प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून कार्य करायचे. मग शासन तुम्हास सेवेत सामावून घेते. प्रशिक्षक निवड तावून सुलाखून होते. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी छात्राध्यापकांना शिक्षक पगाराइतकी शिष्यवृत्ती असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो नियमित सेवेत आला की, त्याला सेवाशर्ती, सुरक्षा योजना, निवृत्तीवेतन, प्रशिक्षण सुविधा प्राप्त होतात. बी.ए., बी.एड., बी. एससी., बी. एड. एम्. ए. बीएड. एम्. एससी, बीएड. किंवा एम.एड. अशा पदव्या दिल्या जातात. प्रशिक्षणात सिद्धांत वर्षांच्या कालावधीचे असले तरी प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधी त्याच्या निम्माच असतो. त्यामुळे शिक्षक निम्माच तयार होतो व निम्माच उपयोगी पडतो. पूर्ण शिक्षकाची घडण हे आपल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमापुढील खरे आव्हान आहे. तसेच कालसंगत प्रशिक्षणाच्या सुधारणा प्रशिक्षण अभ्यासक्रमात जोवर आपण करणार नाही तोवर पाठ घेणारेच शिक्षक तयार होणार. शिकवणारे शिक्षक हवे असतील तर प्रशिक्षण हे गंभीर, कठोर, संशोधनाधारित, कालसंगत करायला हवे.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९६