पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व


 नव्या शिक्षकाचा आजवर आपण जो नव्या काळाच्या संदर्भात विचार करत आलो, त्याला अगदी काटकोनात छेद देणारा विषय घेऊन मी तुमच्यापुढे येत आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. मी तुमच्याप्रमाणे विनित/प्रशिक्षित शिक्षक प्राध्यापक/प्राचार्य होतो. प्राचार्य असताना माझ्या महाविद्यालयात शिक्षणशास्त्र विद्याशाखा होती. बी.ए.बी.एड. च्या विद्यार्थ्यांना मी शिकवत असतानाच्या काळात नव्या छात्राध्यपकांना/ प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या पहिल्या दिवशीचा पहिला तास आवर्जून मी घेत असे. तो एका अर्थाने त्या विद्यार्थ्यासाठी व्यवसायातील स्वागताचा समारंभ असायचा, पण माझ्यासाठी तो विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून दिशा व दीक्षा देण्याचा समारंभ असायचा. नर्सिंग कॉलेजीसमध्ये पण फ्लॉरेन्स नायटिंगेलचा आदर्श पुढे ठेवण्यासाठी म्हणून एक असाच दीक्षा समारंभ असतो. ('Lady with Lamp Day') असे काहीसे त्याचे स्वरूप असते. व्यक्तिमत्त्व म्हणून मला शिक्षक (Teacher) व परिचारक (Nurse) यात नेहमी साम्य वाटत आले आहे. मितभाषण, संयम, सोज्वळता, सेवाभाव, समर्पण, समयबद्धता, सुहास्यवदन, प्रसन्नता, साधेपणा असे कितीतरी गुण दोन्ही व्यवसायात समान आहेत. शिक्षक वर्गात मात्र मितभाषी नसावा, तो एक अपवाद म्हणायचा !
 शिक्षक प्रशिक्षणात शिक्षक व्यक्तिमत्त्वाबद्दल फारसे बोलले, लिहिले जात नाही. 'टोमणे' दिले जातात, गरज असते 'टिप्स' घ्यायची. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व आंतरिक असते, तसे बाह्यही. आंतरिक व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच बोलले जाते. बाह्य व्यक्तिमत्त्वही आंतरिक व्यक्तिमत्त्वाइतकंच मला महत्त्वाचे वाटत आले आहे. शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर प्रथमदर्शनी प्रभाव पडतो, बाह्य

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८७