पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या समीक्षा, संदर्भ ग्रंथ, लेखकाचे जीवन त्यास माहीत आहे का ? हे सारे ज्ञान विद्यार्थ्याला देण्याची, शिकवण्याची त्याची काय योजना, उपक्रम आहेत? तो बहुभाषी संदर्भ जाणतो का? हे आपण पाहात तर नाहीच, पण या अंगाने आपण विचार व अपेक्षाही करत नाही. मग भाषेचा शिक्षक त्या भाषेचा साहित्यकार, कवी, समीक्षक, व्याकरणी, भाषा वैज्ञानिक, बोली संशोधक असा व्यासंगी हवा असे आपणास वाटत नसल्याने आपले भाषा शिक्षक शब्दार्थ शिकवणारे अर्थवाहक, माहितीवाहक झाले आहेत. थोडी शब्दकळा उपजत असलेला शिक्षक शाळा, कॉलेजात कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन अशा जुजबी कौशल्यावर आपला व्यवसाय कसा निभावतो याला काय म्हणावे?
जिज्ञासू ज्ञानसाधक (Curious scholar)
 किमान औपचारिक शैक्षणिक पात्रता घेऊन आलेला शिक्षक त्याच पात्रतेसह व्यवसायातून निवृत्त होण्याचे शिक्षकाचे, आपले प्रमाण मोठं आहे. नाही म्हणायला ते मधल्या काळात सक्तीची जुजबी प्रशिक्षण पूर्ण करतात, तीच काय ती त्यांच्या तंत्र व ज्ञानातील मोलाची भर म्हणायची. स्वविकासार्थ व्यावसायिक गरज म्हणून स्वयंप्रेरणेने वेतन वृद्धीच्या प्रलोभनाशिवाय जेव्हा एखादा शिक्षक पात्रता, क्षमता वृद्धी करून दाखवतो, ती त्यांची अंतःउर्मी असते. असे शिक्षक अपवाद आढळतात. नित्य शिकणारा तो शिक्षक, सतत विद्यार्थी; भुमिका बजावणारा जिज्ञासु ज्ञानसाधक. निरंतर शिक्षण (Continuous Education) ही खरी सजीव शिक्षण प्रक्रिया (Vital Educational Process) ती पाळणारा शिक्षक नवध्यायी, नवोपक्रमशील शिक्षक, अशा शिक्षकाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. तो जाणीव असणारा असतो. त्याला समाजभान असते. भावनिकता, संवेदनशीलता हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. शिकवण्याची त्याची हातोटी अन्य शिक्षकांपेक्षा वेगळी, प्रभावी असते. आपल्या पूर्वज्ञानाधारे तो सतत आपल्या अनुभव व समृद्ध शिकवण्यातनु मुलांची जीवने फुलवण्यात तत्पर असतो. भाषा, साहित्य, संस्कृती, ज्ञाननिष्ठा यांची सांगड घालत शिकवणारा हा शिक्षक स्वतः रोज शिकत, प्रयोग करत आपलं व्यक्तिमत्त्व नित्य विकसित करण्याचा ध्यास घेऊन शिकत-शिकत शिकवतो. (Learning while Teaching)
मार्मिक विचारक (Critical Thinker)
 चिकित्सक असणे आणि जिज्ञासू असणे यात तर्क आणि बुद्धीमधील

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८४