पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्याची किमया आता चुटकीसरशी शक्य होते हे इन्फोग्राफिकचा वापर केल्याशिवाय शिक्षकांना कळणार नाही. भूमिती, अर्थशास्त्र, गणित, विज्ञानाच्या अवघड संकल्पना सुबोध करण्याचे साधन म्हणजे इन्फोग्राफ. हल्ली 'इन्फोटेनमेंट' शब्द 'ज्ञानरंजन' रूपात वापरला जातो. शाळेत तुम्ही 'मल्टिमिडिया', 'व्हिडिओ कॅमेरा', 'इन्फोग्राफिक' च्या मदतीने चक्क वर्गाचे रूपांतर आता स्टुडिओत करता येणे शक्य झाले आहे. 'इझल डॉट ली', 'स्टेंट प्लॅनेट', 'होही', 'क्रिएटली', 'टेबलएयू', 'इंकस्पेस' ही साधने वापरून आपण अवघडातील अवघड कल्पना सुबोध करू शकतो. विद्यार्थ्यांना आता गणित, भूमिती, अर्थशास्त्र, इंग्रजी विषय म्हणजे 'वाघिणीचे दूध' वाटायचा काळ इन्फोग्राफिक्समुळे इतिहासजमा होण्यास हरकत नाही.
* पीपीटी, पीडीएफ, स्लाइडस्
 एखादा अवघड घटक सुलभ करून शिकवायचे. प्रभावी साधन म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेटवर टॉपिक टाइप करून पीपीटी लिहा. उदाहरणार्थ, भूकंप ('Earthquake PPT', 'Earthquake PDF', 'Earthquake slides') एवढे टाइप करा. किती पर्याय येतात पाहा. डोळे व डोके शिणून जाईल इतकी माहिती व काही प्रकारानुरूप उपलब्ध होते. म्हणजे भूकंपाची व्याख्या, भूकंपाचे प्रकार, भूकंपाची कारणे, भूकंप मापन, जगातले मोठे भूकंप काहीही विषय शंका दूर करून सर्वांगपूर्ण माहिती देणारी ही संसाधने शिक्षिकांचे श्रम, पैसा, वेळ वाचवणारे अध्यापनाचे सबलीकृत साधन. 'स्लाइड शेअर', 'आँनिमोटो', 'व्यूबॉक्स', 'नोव्हिओ', (Knovio) 'अहेड', 'हॅलो स्लाइड' या संकेत स्थळांवर शिकवायला सोयीची व उपयुक्त साधने शोधून तर पाहा. ती वर्गात दाखवण्याचा, वापरायचा मोह तुम्हास आवरता येणार नाही.

•••

संदर्भ :-
 1. http://www.educatorstechnology.com
 2. http://www.digitaliteracy.us
 3. http://www.en.wikipedia.org.wiki/E-learning

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८१