पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. त्यानुसार अध्यापन कुशल शिक्षक व्हायचे तर तुम्हाला तंत्रकुशल व्हायला हवे. शिक्षणाची माहिती, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी विकसित झालेली इलेक्ट्रॉनिक शैक्षणिक साधने, सॉफ्टवेअर्स, फिल्मस्, स्लाइडस्, क्लिप्स, व्हिडिओज, ऑडिओ बुक, ई-बुक, थ्रीडी सीडीजचा पूर्वाभ्यास व त्यांच्या समर्पक वापराचे कौशल्य तुमच्यात हवे. तुम्हास विविध ज्ञान, विज्ञान, ग्रंथ, वेबसाईटस्, लिंक्सची नुसती माहिती असणे पुरेसे नाही. ते तुम्ही, कट, पेस्ट, डाऊनलोड, फॉरवर्ड, सेंड करून तुमच्या विद्यार्थ्यांप्रत कसे पोहोचवता यावर तुमच्या नव्या ज्ञान, माहिती प्रसारण, वितरण क्षमतेचे मूल्यमापन होणार, माध्यमांचा वापर तुम्ही किती प्रभावी करता (मुद्रित, इलेक्ट्रॉनिक) यावर तुमच्या अध्यापनाचा परिणाम ठरणार.
 शिक्षक जे शिकवतो ते कसे, कोणत्या पद्धतीने शिकवतो यावर तो देत असलेल्या ज्ञानाचे अभिसरण, संप्रेषण व रुजणे-स्थिरीकरण (Retention) अवलंबून असते. त्यालाच आपण शिक्षणाचा चिरस्थायी परिणाम मानतो. जगभर झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, केवळ मौखिक अध्यापन (Lecture Method) पेक्षा एकमेकास शिकवण्या-शिकण्यातून शिकणे अधिक काळ राहते व चांगले समजतेही. त्याचा पिरॅमिड प्रत्येक शिक्षकांनी लक्षात घेतला पाहिजे.
 एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे यश शिक्षक विद्यार्थ्यात विचार

करण्याचे कौशल्य (Thinking Skill) कसे आणि किती निर्माण करतो यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे मुलांच्यापुढे प्रश्न, समस्या ठेवून ते सोडवण्याची त्याची स्वत:ची क्षमता विकसित करण्यावर आपल्या शिकवण्यावर भर हवा. अशा विद्यार्थ्याला स्वप्नज्ञ बनवणाच्या अध्यापन पद्धतीत मूल्यमापनास (Evaluation) असाधारण महत्त्व प्राप्त होते. शिक्षकाचे मूल्यमापन पारदर्शी, वस्तुनिष्ठ, निष्पक्ष होईल तितके शिक्षणाचे मूल्यमापन वास्तव होणार हे शिक्षकांनी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७४