पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण ज्याला 'ज्ञान' म्हणतो, केवळ माहिती असते व तीही जुजबी पण, आव आपण विद्वानाचा आणत असतो. 'वासरात लंगडी गाय शहाणी' अशी आपली स्थिती असते. ती जगाच्या व्यासपीठावर गेलो की, लक्षात येते.)
 'गुगल' (Google) हे असे संकेतस्थळ आहे की, तिथे शिक्षकाच्या प्रत्येक शंका समाधानाचे अढळपद लाभते. तिथे जगातली सारी माहिती क्रमाने, वर्गीकरण करून, आपणास हवी तशी, हवी तेवढी मिळण्याची सोय आहे. 'डिगो' (Digo) ( https://www.digo.com/) हे बुकमार्कचे ठिकाण. इथे तुम्ही तुमच्या प्रिय संकेतस्थळाबद्दल (Favorite Website) चे तुमचे मत व्यक्त करून इतरांची मतं जाणून घेऊ शकता. 'वादे वादे जायते शूरः' च्या तालावर मतमतांतराद्वारे इथं शिक्षक ज्ञानविस्तार घडवून आणू शकतो. 'ग्लॉगस्टर' (Glogster) (http://www.gloostercom/) हे आभासी जगाचे पोस्टर, होर्डिंग म्हणायला हरकत नाही. जाहिराती जसे आपले लक्ष वेधून घेतात तसे तुमचे नवे मत, संशोधन, प्रकल्प, प्रबंध, प्रकाशन इत्यादीकडे जगाचे लक्ष वेधण्याचे साधन. गावच्या चौकातले फ्लेक्सबोर्ड तसा हा जगाच्या चौकातला. 'प्रेझी' (Prezi) (https://prezi.com/) ची गंमतच न्यारी. त्रिमिती चित्रपट (Three Dimension film) 'मिस्टर इंडिया', 'छोटा चेतन' चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आता घरोघरी थ्रीडी टेलिव्हिजन येत आहेत. (माझ्या घरी तर तो केव्हाच आलाय.) तशी एखादी गोष्ट तुम्हाला थ्रीडी पोस्ट अथवा प्रोजेक्ट करता येते ती इथे! शिक्षकाला सर्वाधिक उपयुक्त ठरणारे ठिकाण... जुन्या भाषेत बोलायचे झाले तर संदर्भ ग्रंथालय, विश्वकोशासारखे ठिकाण म्हणजे 'ड्रॉपबॉक्स' (Dropbox) इथे तुम्हाला हवी असलेली सारी माहिती संग्रह करून (file) ठेवता येते व हवी तेव्हा वापरता येते. मेमरी इथे मोफत साठवता येते. म्हणजे ती नेटवरची बिनभाड्याची सर्व सोयीने युक्त मुक्त खोली. इंटरनेटवर सारे मोफत नसते. काही माहिती मिळवायला पैसे मोजावे लागतात, पण अशा संकेत स्थळांवरील माहिती तुम्हाला 'एव्हरनोट' (Evernote) वर मिळू शकते. ती तुम्हाला लिखित, दृक्, श्राव्य सर्व रूपात मिळू शकते. थोडक्यात ज्ञानाचे अन्नछत्रच! 'क्विझलेट' (Quizlet)(https://quizlet.com/) हे इंटरनेट वरील सर्वात अत्याधुनिक संकेत स्थळ म्हणता येईल. पूर्वी इंटरनेटवर स्थिर

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५७