[२०] ] मेदीच्या प्रसंगी देखील स्वतः किंवा लोकांस हताश होऊं दिलें नाहीं. उलट जो जो जास्त जास्त निराशा होत चालली तो तो हैं देशकार्य करण्याचा त्यांस अधिकाधिकच उत्साह येत चालला. ज्यानें स्वविषयक विचार सर्व का- मांत बाजूस ठेविला होता, ज्याच्या व्यापक बुद्धीस कोण- ताही विषय अगम्य राहिला असें नाहीं, ज्यानें देशकार्यार्थ व कर्तव्यकर्माचरणार्थ आपलें जीवित सर्वस्व वाहिलें व “मना चंदनाचे परि त्वां झिजावें। परी अंतरी सज्जना निव- चावें " या साधूतीची सार्थता आपल्या आचरणानें दाखविली, ज्याने आपल्या आयुष्यक्रमानें आपल्या देश- बांधवांस अत्यंत अनुकरणीय असे उदाहरण घालून दिले, त्याच्या पुण्यतिथीच्या करितां आपण आज येयें जमलों आहों; तेव्हां अशा थोर पुरुषाच्या आत्म्यास शांती देण्याविषयीं परमेश्वराची आपण प्रार्थना करणें हें आपलें अत्यंत पवित्र कर्तव्य आहे, तें करण्यास आपण येथें जमलो आहों. प्रस्तुत महात्म्यानें ज्याप्रमाणे आपल्या देशाचें ऋण यथाशक्ति फेडलें त्याचप्रमाणें आपणही यथा- शक्ति त्याचे पायवाटेनें जाऊन त्याचे उतराई होणें हें आपलें अत्यंत पवित्र कर्तव्य आहे व तें करण्याचें सामर्थ्य देण्याबद्दल आपण ईश्वराची प्रार्थना करूंगा. त्याच- प्रमाणे त्यांची परमपूज्य व त्यांच्या गुणास अत्यंत अशी
पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/२२
Appearance