[ १९ [ त्यांस बिलकुल पर्वा नसे. इतकेच नव्हे तर आपण या मानास पात्र नाहीं असा त्यांचा ग्रह होता. त्यामुळे त्यांनी आपल्या चरित्रकारास कोणत्याही प्रकाराने मदत दिली नाहीं, इतकेंच नाहीं तर तें न लिहिण्याबद्दल त्यांचें मन वळविण्यास देखील माधवरावांनी कमी केलें नाहीं. यावरून त्यांची आत्मिक लीनता किती होती याची कल्पना होण्यासारखी आहे. खऱ्या आत्मिक उन्नती- वांचून अशी मनाची वृत्ति होणें नाहीं. आतां एवढे खरें, जो कोणी महात्मा ठरतो तो आपल्या काळांत फारसा ठरत नाही. तशीच गोष्ट या थोर पुरुषाची झाली. त्यांच्या पश्चात् त्यांचे प्रतिपक्षी देखील त्याचे गुणानुवाद गाऊं लागले. चोहोंकडे त्यांच्या नांवाचा एकच गजर झाला, जी गोष्ट आपल्या समोर असते तोंवर तिचें महत्व आपणांस वाटत नसते. पण ती अप्राप्त झाली की मग त्या मानानेंच तिची अपरूपता वाटायास लागते, असा साधारण नेम आहे. तसाच प्रकार प्रस्तुत थोर पुरुषाच्याबद्दल झाला. असो. तेव्हां ज्या थोर पुरुषानें आपला बहुतेक सर्व जन्म देशाच्या उन्नतीसाधनार्थ घालविला, त्यानें स्वतः ईश्वरावर निःसीम भाव टेऊन मोठ्या आशाभूत अंतःकर- णानें लोककार्यात कायावाचामनानें शक्य तितकें काम केलें. आणि तें करीत असतांना आणीबाणीच्या व नाउ•
पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/२१
Appearance