Jump to content

पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूचना. रा. रा. वा ना. देव यांनी इंदुरास प. वा. न्या. मू. म. गो. रानडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशीं न्यायमूर्तीचे बंधु रा. रा. नीलकंठ गोविंद रानडे यांच्या येथें ईश्वरोपासना चालविली, त्या वेळी त्यांनीं दिलेलें व्याख्यान प्रथम सुवोधपत्रिकेत साग्र प्रसिद्ध झालें, तें सर्वोस संग्रही ठेवतां यावें ह्मणून कांहीं मित्रांच्या सूचनेवरून न्यायमूर्तीच्या बंधूनीं स्वतंत्ररीतीनें आतां प्रसिद्ध केले आहे. प्रार्थनामंदिर, मुंबई ता. १६ मार्च १९०४ } द्वा. गो. वैद्य.