[ १५ ] of individuals हा प्रकार खऱ्या साधुत्वाचा दर्शक आहे असे मला वाटतें. सामाजिक विषयांवरचें त्यांचे लेख अत्यंत कळकळीचे असून त्यांत व्यापकज्ञान, विस्तृत माहिती, कार्यकारणभावाचें यथार्थ तारतम्यज्ञान ही मना- वर ठसतात. या लेखाविषयीं कांहीं इंग्रज लोकांचे फार उत्तम अभिप्राय त्यांच्या चरित्रांत दिलेले आहेत. हीं सर्व भाषणे फार काळजीपूर्वक वाचण्यासारखी आहेत. प्रार्थनासमाजांत व धर्मसुधारणेबद्दल त्यांनी केलेला कार्यभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यांचे फळ त्यांच्या थोर व पूज्य पत्नीच्या परिश्रमानें पुस्तकरूपानें लोकांसमोर आहे; ह्यावरून त्यांचे धर्मविचार किती उन्नत व उदात्त होते हैं सहज समजतें. धर्मविषयांत त्यांनी पुष्कळ विचार केला होता व त्याबद्दल बरेच इंग्रजी व मराठी लेख लिहिले होते, आपल्या साधूवृंदाविषयीं त्यांचा अत्यंत पूज्यभाव होता. या वर्गाविषयी त्यांनी आपल्या इतिहास- ग्रंथांत एक भाग लिहून धर्मसुधारणेस कशी मदत केली हें व्यक्त करून युरोपांतील रिफार्मेशनशीं त्यांचें कांहीसें साम्य दाखविलें आहे. असे करतांनां आमच्या धर्मसुधारकांनी ईश्वराच्या जवळ जाण्यास कोणा मध्यस्थाच्या आडकाठीची गरज ठेविली नाहीं; ही पाश्चात्य धर्मसुधारका- हूनही अधिक सोयस्कर गोष्ट केली, अशी त्यांची थोरवी
पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/१७
Appearance