Jump to content

पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १० ] गुण प्रगट झाले त्यामुळे ते संपूर्ण हिंदुस्थानांत वंद्य झाले. त्याचें थोडेंसें दिग्दर्शन करितों. माधवरावांच्याठायी अप्रतीम कर्तव्यतत्परता होती. तिला त्यांनी आपलें जीवित सर्वस्व वाहिलें होतें, तिचा निदिध्यास अहर्निश त्यांस लागला होता, तिची विस्मृति त्यांना क्षणमात्र सहन होत नसे. तिच्या पुढे आपल्या जीवि- ताची मातब्बरी त्यांस कधींच वाटली नाहीं. कर्तव्यकर्मा- चरणापासून प्राप्त होणाऱ्या आनंदापुढे इतर ऐहिक सौ- ख्यानंद त्यांनी तुच्छ मानले. आणि या कर्तव्यकर्माचरणा- च्या अतिरेकासच ते बळी पडले असें त्यांच्या चरित्रांत स्वच्छ ह्यटले आहे. माशास पाण्याबाहेर काढल्यानें त्याची जशी दशा होते तशीच कर्तव्यकर्माचरणाव्यतिरिक्त माघ- वरावांची होत असे. शेवटच्या दुखण्यांत कोणत्याही प्रका- रचे मानसिक श्रम न करण्याची सल्ला डाक्तरानें दिली, तेव्हां ती त्यांस मानवली नाहीं. व त्यांनी पुढील आश याचे उद्गार काढले. " Doctor, I would rather prefer to die than to drag on a purpose- less existence. It is a pleasure to die while working" हे त्यांचे मरणापूर्वीचे उद्गार त्यांच्या संबंधांत अक्षरशः खरे झाले. अशी कर्तव्यपरता प्राणव्य- यापर्यंत पाळणारा महात्मा आपल्या देशबांधवांच्या मानास,