Jump to content

पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[<] मार्गक्रमणांत त्यांचा प्रतापार्क एकसारखाच दीप्तिमंत राहिला असें नाहीं. केव्हां केव्हां तो आभ्राच्छादितही होत गेला. पण "सत्यमेवजयते" या तत्त्वाच्या प्रभावानें हें धुकें लवकरच वितळत गेलें. आणि त्याचें सत्यस्वरूप प्रकाश- मान झाले. परंतु या गोष्टीशी त्यांच्या महतीचा मोठासा संबंध नाहीं. राजसेवेंत अत्यंत उत्कर्ष झाल्यामुळे त्यांची चोहोंकडे थोरवी वाढली असें ह्मणतां येत नाही. राजसेवेंत त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत दक्षतेनें व एकनिष्टेनें केलें, त्यामुळे बरेंच लोकहित त्यांच्या हातून घडलें ही गोष्ट खरी आहे. या कामांत त्यांची विद्वत्ता, मार्मिकता, निस्पृहता, नि:पक्षपात, सदसद्विचारपरता, विचारस्वांतत्र्य, व्यक्ति- स्वातंत्र्य, स्वाभिमान, स्वदेशाभिमान, सत्यनिष्ठा इत्यादि अनेक गुण कसोटीस लागले व त्यामुळे राजा व प्रजा या उभयतांचें पुष्कळ हित झालें ही गोष्ट सर्वमान्य आहे. परंतु या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी, त्यामुळे लोकदृष्टीनें जें महत्पद त्यांस मिळाले, तें मिळाले असतें कीं नाहीं याचा संशयच आहे. कारण, माधवरावांस जें राजसेवेंत महत्पद मिळालें तें त्यांच्या पूर्वी व पश्चात् पुष्कळांस मिळालें होतें व आहे. व या कामांत इतरांच्या हातूनही माधवरावांच्या ठायीं प्रगट झालेले गुण बऱ्याच अंशीं प्रगट झाले, पण लोकांनी त्यांस माधवरावांस दिलेली थोरवी दिली होती