पान:देशी हुन्नर.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९३ ]
चिलखतें व हत्यारें.

 ऋग्वेदांत असें लिहिलें आहे कीं ' बाण ' या हत्यारास पक्षाचे पंख लाविलेले असतात. त्याच्या टोंकांस हरणाचें शिंग असतें व तें गाईच्या आतडयांतील तातीनें बांधिलेलें असतें.' हें अगदीं फार प्राचीन काळच्या बाणाचें वर्णन आहे. या काळापुढें आमच्या हत्यारांत पुष्कळ सुधारणा होत गेली.

 पुणें येथील प्रदर्शनांत शक्ती नामक हत्याराचे नमुने आले आहेत. यांस बाणही ह्मणतात. कुरुक्षेत्रीं एका पिंपळाच्या झाडाखालीं असलेला एक फार जुनाट पार पुनः बांधण्याचें काम एका 'पुण्यशीळ ' व्यापाऱ्यानें सुरू केलें त्यावेळीं तेथें पाया खणतानां त्यास मोठ्या वरोट्या येवढाले लोखंडाचे तुकडे सांपडले, ते तपासून पाहतां असें आढळून आले कीं त्यांतील प्रत्येकाच्या एका बाजूस बारीक भोंक आहे, व त्यांत दारू आहे. हे बाण कुरुक्षेत्रीं सांपडले असल्यामुळे कौरव पांडवांच्या युद्धांतील असावेत असा कित्येकांचा तर्क आहे. एका इंग्रेजी ग्रंथकाराने १०२४ सालीं सोरटी सोमनाथ येथें झालेल्या लढाईचें वर्णन करितांना हिंदु लोकांनीं मुसलमान लोकांच्या हत्तींवर असल्या तऱ्हेचे बाण सोडले असें वर्णन आहे. त्यांत हा लोखंडी वरोटा एका मोठ्या बांबूस बांधून त्यास बत्ती लावून मोठ्या चपळाईनें शत्रूच्या अंगांवर ते फेंकून देत असें ह्मटलें आहे. तेव्हां निदान ८०० वर्षांपूर्वी असल्या बाणांच्या अस्थित्वाचा पुरावा होता असें सिद्ध होतें.

 शुक्रनीति नांवाच्या संस्कृत पुस्तकांत बंदुकीचें, तोफेचें, व दारूचें, वर्णन आहे. डाक्टर राजेंद्रलाल मित्र यांनी या ग्रंथाचे इंग्रेजी भाषान्तर केलें आहे, त्यांत नंबर १३५ पासून १५१ पर्यंतच्या श्लोकांत हेंच वर्णन केलें आहे. त्यावरून दारू व दारूगोळा प्राचीनकाळीं होता याबद्दल संशय राहिला नाहीं.

 बर्च्या , भाले, अंकुश, चक्र, तलवारी, जंबिये, परशु. गदा, त्रिशुळ, धनुष्यें, गुप्ती, धांव, वगैरे हत्यारें प्रसिद्धच आहेत. विष्णूच्या हातांतील चक्र कसें असतें हें कोणास पाहणें असेल तर त्यानें पुणें येथील प्रदर्शनांत जाऊन पहावें. हें हत्यार अजून सूद्धां पंज्याबांतील शीख लोक वापरतात. हें चक्र वाटोळें असून तल वारीच्या पानासारखें आंतून जाड व बाहेरून चपटें असतें. तें बोटावर धरून गरगर गरगर फिरवितात. व त्यास गती आली ह्मणजे एकदम शत्रूच्या