पान:देशी हुन्नर.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९१ ]

स्ताची भांडी तयार करितात. या भांडयांत ठेविलेले अन्न व पाणी शरीर प्रकृतीस थंडावा आणितें अशी शमजूत असल्यामुळें त्यांची विक्रीही फार होते.

 नेपाळ देशांत पट्टण गांवीं नेवार लोक देवाच्या मूर्ति, देवपुजेचीं भांडीं, तरतऱ्हेचे दिवे, व समया तयार करतात. देवळांत टांगण्या करितां ते लहान लहान घंटा तयार करीत असतात त्या घंटाच्या लोळ्यास पानाच्या आकाराचे पितळेचे पत्रे बांधितात हें पत्रे वाऱ्यानें हालल्यामुळें घंटांचा आवाज एक सारखा चालत असतो. आमच्या हिंदु लोकांच्या देवळांत बांधण्या करितां मोठाल्या पितळेच्या घंटा व बौद्ध धर्माच्या देवळांत बांधण्या करितां पंचरशी घंटा नेपाळांतच तयार होतात.

 आसाम प्रांतीही पितळेचीं व काश्याचीं भांडीं तयार होत असतात. हें काम करणारे लोक जातीचे मुसलमान आहेत व त्यांस त्या प्रांती मरिया ह्मणतात.

 ब्रह्मदेशांत बुद्धाच्या लहान मोठ्या मूर्ति, बैलाच्या गळ्यांत बांधण्या करितां लहान घंटा व घुंगुर, आणि देवळांत टांगण्या करितां पराती सारखे मोठाले तांस तयार होतात. सन १८८१ सालीं ब्रह्मदेशांत पितळेचें काम करणारे लोक कायते ५६४ होते त्यांत रंगून, प्रोम, व हंतवाडी याच गांवीं ह्याच लोकांची वस्ती फार होती. मेण दाहा भाग, व राळ साडेसात भाग, एकत्र करून त्यांत टरपेन्टाईन ओंतून तें पातळ झालें ह्मणजे पाण्यांत ओततात नंतर तूस, रेती व माती एकत्र करून त्याचा एक पुतळा बनवितात. ह्या मूर्तिवर वर सांगितलेल्या मेणाचे थर देतात व ते कोरण्याने कोरून काढितात. पुतळ्या वर पुनः माती थापतात. मात्र कोठेतरी त्याला एक भोंक ठेवावें लागतें. वर दिलेला मातीचा थर सुकला ह्मणजे तापवून त्यांतील मेण काढून टाकितात. सर्व मेण वितळून गेल्यावर मूर्तिच्या बुडाशीं असलेलें भोंक मातीनें बंद करितात. व बर असलेल्या भोंकातून त्यांत पितळेचे पाणी ओततात. पितळ एकदोन दिवस निवत ठेवून त्याच्या वरची व आतली माती काढून टाकितात व कानशीनें घांसून नंतर पालिश कागदानें साफ करून तिख्याच्या घोटणीनें झील देतात. पितळ तयार करितांना साठभार तांबें व चाळीस भार कथील घेण्याची चाल आहे परंतु चांगला माल तयार करण्याचा असल्यास ५४ /१० तांबे, ४० भार कथील, व  /१० भार जस्त घ्यावें लागत. मोठ्या घंटा करण्याकरितां एक भार तांबें, व पाऊण भार जस्त घेतात. घुंगरा करितां १०