पान:देशी हुन्नर.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७४ ]

 झालवर प्रांती पट्टण म्हणून एक गांव आहे तेथें बगळ्याच्या आकाराचें गुलाबदान चांगलें होतें.

 बिकानेर येथें कांहीं चांदीचें काम होतें. त्याचें वर्णन करतांना बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांनीं मराठे लोकांवर थोडी आग झाडली आहे. त्यांच्या मतें आम्ही लुटारूंपणांतच प्रसिद्ध आहों. या उल्लेखाबद्दल आमचे स्नेही बाबू साहेब यांजवर न रागावतां आम्ही आमच्या कारागिरांस मात्र विनंती करितों कीं, हस्तकौशल्यांत अजून बंगाल प्रांत आमच्यापुढें जाण्यास अवकाश आहे तरी बंगाली लोक त्यांतही आपल्या स्तुत्य उद्योगानें आम्हांस मागें सारण्यास पाहत आहेत. तेव्हा आम्हीं कमरा बांधल्याच पाहिजेत. मागें पडतां कामा नये.

 ग्वाल्हेर, होळकरशाहींतील रामपूर, धार, अल्लीपूर व छत्रपूर या गांवीं सोन्या रुप्याचीं भांडीं होऊं लागलीं आहेत. धोलका, विरमगांव, अमदाबाद, जुनागड या गांवी पूर्व सोन्या रुप्याचीं भांडीं होत असात. परंतु आलिकडे सामसूम आहे.

 मद्रास इलाख्यांत दिंडिगुल, पलई, मोदावरी, तंजावर, तिसपट्टी, कोचीन व विजयनगर या गांवीं रुप्याची भांडीं होतात.

 म्हैसुरास चांदीचीं तबकें चांगलीं होतात.

 निजामशाहीत औरंगाबाद व झेलूगंडल गांवीं असलें काम होतें अशी अफवा आहे.

 ब्रम्हदेशांत होणारें चांदीचें काम मात्र आमच्या कच्छच्या कामास मागें सारील अशी धास्ती आहे.

मिन्याचीं भांडीं.

 मिन्याच्या दागिन्याचें वर्णन देतांना याबद्दल कांहीं माहिती आलीच आहे. जयपूरासारखें उत्तम काम पृथ्वींतही कोठें होत नाहीं असें आम्हांस वाटते. या सुंदर शहरी पुष्कळ जातीच्या कारागिरांस महाराजांचा आश्रय असल्यामुळें ते पिढ्यानपिढ्या तेथेंच राहिले आहेत. त्यांतच मिनागारही शेंकडो वर्षांपूर्वी तेथें जाऊन राहिले आहेत. जयपूर येथील मिन्याच्या कामाचा जुन्यांत जुना नमुना म्हणजे एक कुबडीची कांठी आहे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस जयपूर येथील महाराज मानसिंग अकबर बादशहाच्या दरबारीं गेले होते