पान:देशी हुन्नर.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७२ ]

ल्याप्रमाणें नेमलेला माल मुंबईतील चित्रशाळेंत दिजेंबर अखेर पाठवावा. पुढें त्याचा कमटींत तपास होऊंन बक्षीस कोणास द्यावयाचें तें ठरतें. हिंदुस्थानांतील कोणत्याही प्रांतांतील कारागिरानें माल तयार केला तरी चालतो ह्याप्रमाणें बक्षीस मिळवून उमरसी मावजीनें कच्छ प्रांताची अब्रु वाढविली आहे, त्याप्रमाणें आमच्या इलाख्यांतील इतर कारागीर पुढें सरसावतील अशी आमची उमेद आहे. असो; कच्छच्या धर्तीवर हल्लीं अहंमदनगर येथे "खरशेटजी ॲान्ड सन्स' या कंपनीने चांदीचा माल तयार करण्याची सुरवात केली आहे. खानसाहेब खरशेटजी शेट यानीं याप्रमाणें कारखाना काढून देशी कारागिरांस पोट भरण्याची सोई लावून दिली आहे. हे त्यांचे आमच्या अहंमदनगरच्या सोनारांवर उपकार आहेत. चांदीच्या भांड्यांचा व्यापार मुंबईत जितका होतो तितका इतर कोठेंही होत नाहीं. ही गोष्ट लक्षांत ठेवून आमच्या प्रांताचे वर्चस्व राखण्यास होईल तितका यत्न करणें आपलें काम आहे. असें सर्व तत्संबंधीय व्यापाऱ्यांनी समजलें पाहिजे. कच्छचें सामान तोळ्यास दीड रुपयापासून दोन रुपये भावानें विकते. अहंमदनगरचा माल खानसाहब खरशेटजी शेट यांनी मुद्दाम स्वस्त लाविला आहे. तोळ्यास तीन आण्यांपासून आठ आणेपर्यंत भावानें तें माल विकतात.

 सेंट्रल प्राव्हिन्समध्यें चंदा या गावी पूर्वी सोन्यारुप्याचें काम चांगलें असे. परंतु इंग्रजी राज्यांत जुन्या प्रकारच्या सामानास गिऱ्हाईक थोडें व नव्या प्रकारचा ह्मणजे साहेब लोकांच्या उपयोगी पडण्यासारखा माल चंदा येथील लोक तयार करीत नाहींत त्यामुळें तेथील पेठ बुडाली.

 वायव्ये कडील प्रांतांत लखनौ व रामपूर या दोन गांवी चांदीचें सामान होतें अशी ख्याति आहे, परंतु तेथें परदेशी पाठविण्यासारखा माल अजून फारसा होऊं लागला नाही. काही भाग पितळेचा व कांहीं चांदीचा असें काम लखनौ शहरीं पूर्वी होत असे,परंतु ती राजधानी मोडल्यापासून तेथील इतर हुन्नरांप्रमाणे सोनारांचाही धंदा बुडाला असें सर जार्ज बर्डवूड साहेब यांचें ह्मणणें आहे.

 सीतापुरास कांहीं चांदीचें काम होऊं लागलें आहे. परंतु त्यांत फारसा दम नाहीं. फैजाबाद व हमीरपूर येथें चांदीची माशाच्या आकाराची शिशि करितात. मथुरा जिल्ह्यांत गोकुळांत चांदीचे गाई बैल वगैरे जनावरांचे पुतळे करितात.

 बंगाल्यांत डाका व कटक हे दोन गांव खेरीज करून इतर ठिकाणीं चांदी-