पान:देशी हुन्नर.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५५ ]

कधीं त्याजवर हिऱ्यासारखी चमक मारते.हा धंदा करणारे दिल्लीचे लोक इतके हुशार आहेत कीं, त्यांच्यापुढें कोणताही नमुना ठेवा ते त्याची हुबेहूब प्रत उठवून देतात मेहेरबान किपलिंग साहेबांचें असें ह्मणणें आहे कीं दिल्लीच्या सोनारांनी हिंदुस्थानांतील सर्व सोनारांचा धंदा आपल्या स्वाधीन करून ठेविला आहे. मद्रासेंतील "स्वामी" ची नक्षी ह्मणजे देवादिकांच्या मूर्तीची नक्षी ही सुद्धां ते साहेब लोकांच्या दागिन्यांवर करूं लागलें आहेत. घड्याळाच्या सांखळ्या तर शेंकडों तऱ्हेच्या तयार करितात. युरोपियन तऱ्हेच्या साखळ्या पुढें ठेवून त्यांत कांहीं फेरफार करून देशी रूप त्यांस देऊन त्याच पुनः युरोपियन लोकांस विकतात. परंतु ही अमुक तऱ्हा आपल्या देशांतील पूर्वीच्या तऱ्हेवरून बनविली आहे असे गिऱ्हाइकाच्या लक्षात येऊं देत नाहींत. इतके ते कुशल आहेत. या लोकांचे काम कधीं कधीं इतके नाजूक असतें की युरोपियन लोकांस त्याची नक्कल सुद्धां करितां येत नाही. "बाभूळ काम" ह्मणजे बाभळीच्या फुलांसारखें काम हेंच फार बारीक असतें. दिल्ली येथें हस्तिदंतावर काढलेल्या बारीक तसबिरीचें पाठीमागे वर्णन केलेंच आहे. त्याच्या माळा व कंकणे करून विकितात. तसेच सोन्या रुप्याचे नाण्यासारखे तुकडे पाडून त्यापजवर मिन्याचें काम करून त्याच्याही माळा करितात. हलक्या सोन्याच्या बारीक पत्र्यावर शंभर नंबरी सोन्याचीं फुलें किंवा रत्नें बसवून त्यांत लाख भरून त्याचेही दागिने करितात. कधीं कधीं पोवळीं, तैलस्फटिक अथवा जुनीं नाणी यांचेही दागिने करितात.

 मद्रास इलाख्यांतील व मुख्यत्वेकरून त्रिचनापल्ली शहरांतील “स्वामी" दागिने युरोपखंडांत पुष्कळच प्रसिद्धीस आले आहेत. पाश्चिमात्य आकाराचे दागिने करुन त्याजवर देवांच्या मूर्ति काढून विकण्याचा सपाटा सुरू आहे. त्रावणकोर, कोचीन, साऊथ कानडा व विजगापट्टण या शहरींही असले दागिनें होऊं लागले आहेत. मदुरा, चिंगलपट, कर्नूल, सालेम, अनंतपूर, कृष्णा, मलबार, गोदावरी व तंजोर या सर्व जिल्ह्यांत असलें काम होतें. आमचे महाराष्ट्र देशांतील सोनार मात्र स्वस्थ झोंपा घेत आहेत. त्यांचे डोळे लवकर उघडतील तर बरें.

मिन्याचे दागिने.

 मिन्याचें काम करण्याची माहिती आमच्या लोकांस जरी प्राचीनकाळापा-