पान:देशी हुन्नर.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५४ ]

चांदी व एक भार कथील एकत्र आटवून सांच्यांत ओतून त्याच्या लगडी करितात. ह्या लगडी ठोकून लहान मोठ्या जंत्रीतून ओढून त्याच्या बारीक तारा कारतात. नंतर अभ्रकावर एका प्रकारची चिकोटी लावून त्याजवर तारेची नक्षी चिकटवितात. आणि मग त्याला ठिकठिकाणी डाग देतात. हे दागिने साफ करणें व त्यांस झील देणें ही कामें मोठ्या कौशल्याचीं आहेत.

 कटक येथें साहबे लोकांकरितां तयार होत असलेल्या कांहीं दागिन्यांचें वर्णन खालीं दिलेलें आहे.

 लिलिब्यांगल्स--कमळाचीं फुलें एका ठिकाणीं माळून तयार केलेलें कंकण.
 लिलिनेकलेस--वरप्रमाणेंच कंठ
 लिलिब्रेसलेट--वरप्रमाणेच कंकण.
 लीलिब्रोच--कमळाच्या आकाराचें गळ्यांतील फूल.
 लिलिइयररिंग--वरच्याप्रमाणेंच कानांतील फूल.
 डायमण्ड ब्यांगल्स--चांदीच्या बिलोरी बांगड्या.
 डायमण्ड ब्रोच-गळ्यांतील बिलोरी फूल.
 लिफ ब्रोच--पानाच्या आकाराचें गळ्यांतील फूल.
 लीफ ब्यांगल्स--पानाची नक्षी ज्यावर काढलेली अशी बांगडी.

 बटर फ्लाय ब्रोच
 बटर फ्लाय नेकलेस यांत फुलांच्या बदला पाकोळ्या असतात.
 बटर फ्लाय ब्रेसलेट
 बटर फ्लाय इयर रिंग

 हंत्रीवजा दागिने-- याच तऱ्हेचे तयार होतात.

 कटक येथें तयार होणारे सर्व दागिने सुमारें तीनशें रुपयांस विकत मिळतात. ते खरेदी करून पुणें येथील सर्व संग्रहालयांत ठेवून गांवच्या सोनारांस वारंवार दाखवून त्यांजकडून त्याच प्रकारचे दागिने तयार करविले तर या जुन्या राजधानीत एक नवीन धंदा सुरू केल्याचें श्रेय येणार आहे. असलेंच काम डाक्यासही होत असतें. या डाका शहरीं पूर्वी 'मंदिला' या नांवाचें फारच बारीक काम होत असे. परंतु अलीकडे तसलें काम कोठेच दृष्टीस पडत नाहीं.
 वायव्य प्रांतांत युरोपियन लोकांकरितां लखनौ शहरीं पुष्कळ दागिने तयार होतात. हें काम बिलोरीच असतें. परंतु त्याजवर इतकी झील देतात कीं, कधीं