पान:देशी हुन्नर.pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५२ ]

होता त्यामुळें त्यांच्यांतील पुष्कळ रीतिभाती सुद्धां तेथील हिंदु लोकांत शिरल्या आहेत.

कानांतील दागिने.

 धेनरी--आपल्या तोंगलाच्या ठिकाणीं हा दागिना घालतात.

 माक्री--मुसलमानांप्रमाणे कानाच्या सर्व पाळीभर घालावयाच्या बाळ्या.

 पाशा--ह्मणजे कुडीं.

 झुंका--ह्मणजे तोंगल.

 कर्णफूल--एक प्रकारचे कुडें.

 कान--हा कानाच्याच आकाराचा व तितकाच मोठा सोन्याचा दागिना असून त्याजवर बाळ्याबिळ्या असतात. ह्याचें कानावर झांकण घालितात.

 पिंपळपाता--पिंपळपानी बाळ्या.

 चापा--चाफ्याच्या फुलाच्या आकाराच्या बाळ्या.

 अशा प्रकारचे अनेक दागिने आहेत. परंतु येथें त्यांचें वर्णन करण्याची जरुरी दिसत नाहीं.

 ब्रह्मदेशांतील सोनार, सोन्याचे दागिने तांबडे दिसण्याकरितां बंदुकीची दारू एक भाग, मीठ अर्धा भाग, व तुरटी एक भाग घेऊन त्यांत पाणी घालून ते अर्धा तासपर्यंत उकळावतात. या पाण्यानें सोनें धुतलें ह्मणजे साफ होतें. त्याजवर चिंच, गंधक आणि मीठ पाण्यांत कालवून लावितात, त्यामुळें सोनें तांबडें होतें. चिंच, गंधक व मीठ हे किती किती घ्यावयाचे हे सोनारास माहित असतें, ते कोणास सांगत नाहींत.

पच्चीकाम.

 श्रीमंत लोक जडावाचे दागिने वापरतात. त्यांत हिरे, माणीक, लाल, पाच, पिरोज, अकीत, पुष्कराज, गोमेद, हीं रत्नें मुख्य आहेत, पच्चीकारास उत्तरहिंदुस्थानांत मुरासियाकार किंवा कुंडनसाज ह्मणतात. दिल्लीस पच्चीचें काम फार चांगलें होतें. अकीकावर सोन्याचीं झाडें कोंदणांत बसवून त्यांत माणकाचीं, लालडीचीं व हिऱ्याचीं फुलें बसवून तलवारीच्या मुठी तयार करितात. परंतु असले काम पाहणें असेल तर विलायतेंतील बड्या बड्या साहेब लोकां-