पान:देशी हुन्नर.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५१ ]

एकाच जातींत राहिल्यामुळें त्यांचे कौशल्य वाढून व त्यांच्या धंद्यांतील बारीक खुब्या जातीच्या बाहेर न गेल्यामुळें त्यांचें हजारों वर्षे राखून ठेविलेलें कौशल्यवर्चस्व अलीकडे लयास चाललें आहे; कारण पाहिजे त्या जातीचा मनुष्य पाहिजे तो धंदा शिकूं लागला. पूर्वी आपल्या जातीचा धंदा सोडून इतर जातीचा धंदा करणारास बहिष्काराची धास्ती होती ती आतां राहिली नाहीं. आतां जाती अन्नव्यवहार, लग्ने व धर्मसंबंधी कृत्यें येवढ्याच पुरत्या आहेत.

 सोनार दागिने घडतात परंतु त्यांस रत्नें जडविणें असेल तर त्यांच्यांतच पच्चीकार ह्मणून एका प्रकारचे लोक आहेत त्यांजकडे हे दागिने पाठवावे लागतात. तसेंच मिन्याचें काम करणारे वेगळे लोक आहेत. मिन्याच्या कामाबद्दल जयपूराची फार ख्याती आहे. पश्चिम हिंदुस्थानांतील दागिने वर्णन करण्याची येथें कांहीं जरूर नाहीं. परंतु बंगाल्यांतील कांहीं दागिन्यांचीं नांवें खालीं दिलीं आहेत.

बंगाली दागिने.
डोक्यांतील दागिने.

 सिंथी--ह्मणजे बिंदी.

 झिंजिर--केंस बांधण्याची सोन्याची किंवा रुप्याची सांखळी.

 कांटा--चांदीचा लांब कांटा व त्याजवर सोन्याचें फूल असतें तें.

 चिरूनी--सोन्याची फणी, ही दागिन्यासारखी डोक्यामध्यें घालतात.

नाकांतील दागिने.

 नाकछाबी--नाकांतील कुड्यांच्या आकाराची नथ.

 माकरी--सोन्याचे वाळे.

 बेसर--चंद्रकोरीच्या आकाराची सोन्याची बाळी. ही बैलाची वेसण असते त्या ठिकाणीं घालतात.

 नोलक--एकच लांबट मोत्ये असलेली सोन्याची बाळी. ही वरच्या दागिन्याप्रमाणें घालतात. हा दागिना मुसलमान लोकांपासून बंगाली लोकानीं घेतला असावा. बंगाल प्रांत मुसलमान लोकांच्या हाताखाली पुष्कळ वर्षे