पान:देशी हुन्नर.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४५ ]

 चूडामण्डन--कमळाच्या पानाच्या आकाराचा सुवर्णाचा एक दागिना. हा केतकाप्रमाणे दण्डक या दागिन्याच्यावर घालीत असत.

 चूडिका--कमळाच्या फुलासारखें सोन्याचें फूल.

 लम्बन--हें वेणीतींल फुलांच्या माळेचें नांव. तिला बंगाल्यांत झाला ह्मणतात. या फुलांस दोन्ही बाजूस मोत्ये लावीत व मध्यें पाचूचा खडा बसवीत.

 मुकुट--राजांप्रमाणें पूर्वी राण्याही मुकुट घालीत असत. त्याजवर पुष्कळच रत्नें बसवीत. व मयूरादि पक्ष्यांच्या पिसाचा तुरा लावीत. याच्या आकारांत कांहीं फेरफार करून बंगाल्यांतील “ अर्वाचीन “ नामधारी राण्या एक प्रकारचा सोन्याचा मुकुट डोक्यावर घालीत असतात.

कानांतील दागिने.

 मुक्ताकंटक--मोत्याच्या सांखळ्याचें हे प्राचीन नांव असावें.

 द्विराजिक--ह्मणजे भीकबाळी. हिच्यांत दोन मोत्यें असून मधला खडा पाच, माणीक इत्यादि रत्नांचा असे. यांस बंगाल्यांत “बीरबावळी " म्हणतात.

 त्रिराजिक--तीन मोत्यांची भीकबाळी.

 स्वर्णमध्य--दोन मोत्यांमध्यें सोन्याचा लोलक अशी भिकबाळी.

 वज्रगर्भ--मध्यें हिरा, बाजूस दोन मोत्यें व त्या दोन्हीमध्यें इतर रत्नें घातलेली भिकबाळी. बंगाल्यांत तीस “गिमडा" ह्मणतात.

 भूरिमंडल--वरच्याच प्रमाणें परंतु लोलकाच्या व मोत्याच्या मध्यें ही हिरेच बसविलेली भीकबाली.

 कुंडल--सोन्याचीं कुडीं. यांत एका खालोखाल एक व एकावर एक बसविलेलीं तबकटें असून त्यांच्या कोंदणांत हिरे बसविलेले असत. प्राचीन काळी स्त्रियाप्रमाणें पुरुषही असली कुंडलें कानांत घालीत. व उत्तर हिंदुस्थानात अझून सुद्धां तसें करितात.

 कर्णपूर--फुलाच्या आकाराची कुंडलें. यांचे कर्णफुल, चम्पा, झुंंबा, झांपा