पान:देशी हुन्नर.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४४ ]

अशी समजूत आहे. नवरा मेला म्हणजे हें लोखंडाचे कंकण काढून टाकितात. अलीकडील श्रीमंत लोक हे लोहकंकण सोन्यानें मढवूं लांगले आहेत.


प्राचीन दागदागिने.

 जुन्या संस्कृत ग्रंथांत खाली लिहिलेल्या दागिन्यांचें वर्णन सांपडते.

डोकीचे दागिने.

 डाक्टर राजेंद्रलाल मित्र या गृहस्थानें “धी इंन्डो आर्यन्स " नांवाचें एक पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. त्यांल ते ह्मणतात कीं, प्राचीन काळीं स्त्रियांच्या केशकलापाची व स्त्रियांच्या वेणी घालण्याच्या प्रकाराची मोठी प्रतिष्ठा असे. डोक्यांत पक्षांची पिसें घालणें, फुलांच्या माळा घालणें, व सुवर्णादि चकचकीत धातूचे दागिने घालणें हे प्रकार स्त्रियांच्या अंगी असलेल्या स्वाभाविक नीटनेटकेपणाचें साहजिक फळ होय. मोत्यें, सोन्याच्या सांखळ्या, बिजवरें व रत्नजडित मुकुट प्राचीन काळीं घालीत असत. त्यास खाली लिहिल्याप्रमाणें नांवें होतीं.

 माल्य--सोन्याची फुलें.

 गर्भक--या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद आहे. कांहीं लोकांचें म्हणणें असें आहे कीं, हा एक सुवर्णाचा कांटा होता, कांहीं ह्मणतात ही केंस बांधण्याची सांखळी होती.

 ललामक--हा बिजवऱ्यासारखा एक दागिना होता परंतु त्यास बिजवऱ्याप्रमाणें पेट्या नसून सोन्याची पानें असत.

 अपिर--भांगावर बांधण्याची एक सांखळी.

 बालपास्य--केंसाभोंवती गुंडाळलेली मोत्यांची माळ.

 पारितथ्य--यांस सिंथि असेंही नांव आहे. हा बिजवरा असावा.

 हंसतिलक--पिंपळाच्या पानाच्या आकाराचा हिरेजडित एक दागिना असे. हा बिजवरा जेथें बांधितात तेथेंच बांधीत.

 दण्डक--कंकणाच्या आकाराचा सोन्याचा पोकळ दागिना करून त्याजवर मोत्यें बसवीत. हा हालविला ह्मणजे खुळखुळ्याप्रमाणें वाजे.