पान:देशी हुन्नर.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३५ ]

च्या तुंब्याचा आकार असतो. डाक्तर बिडीसाहेब यांचे असें ह्मणणें आहे कीं, युरोप खंडांत 'गिटार ' या नांवाचे वाद्य आहे तें या विण्यावरून तयार केलेलें आहे. त्याचें इटली भाषेतील नांव ' चित्तर ' असे आहे. स्पेन देशांत “गिटारा" म्हणतात. व फ्रान्स देशांत " गेटेर " म्हणतात. ही सर्व नांवें एका शब्दापासून उत्पन्न झालीं असावींत यांत कांहीं संशय नाहीं. त्यांच्यात सात तारा असतात त्यापैकीं सहा एका घोडीवरून नेऊन वेगवेगळ्या खुंटयांस गुंडाळलेल्या असतात परंतु सातवी खालच्या घोडीपासुन थोड्या अंतरावर एका धातूच्या खुंटीस गुंडाळलेली असते.
 सतार:--सतारीच्या जाती पंजाबांत पुष्कळ आहेत. तिजवर हस्तीदंताची अगर सोन्याच्या वर्खाची नकशी करितात. मध्यम सतार, चर्गासतार, तरफदार सतार, ह्या तीन जाती विशेष प्रसिद्ध आहेत. सतारीची पक्की तार दिल्ली व बरेली या गांवीं तयार होते.
 किनरी विणा:--याचा तुंबा शहामृगाच्या अंड्याचा किंवा सोन्या रुप्याचा असतो. युरोप खंडांतील ज्यू लोकांचें " किनोर" वाद्य या वाद्यापासून झालें असावें. मद्रास इलाख्यांत किनरी या वाद्याच्या दांडयाच्या दोन्ही टोंकांस राक्षसांची तोंडें कोरलेलीं असतात. व त्याच्या प्रत्येक टोकास दोन भोपळे लाविलेले असतात व तारा दोनच असतात.
 महती विणा:--हा विणा नारद ऋषीने शोधून काढिला. यास “ बिन " असें म्हणतात. त्यांत पांच मुख्य तारा असून दोन बाजूस आणखी दोन तारा असतात. हा विणा वाजविण्यास नखी लागते.
 नादेश्वर विणा:--हा अर्वाचीन आहे. या देशांतील कच्छपी विणा व विलायती ' व्हाओलिन ' या दोन्ही मिळून हा केलेला आहे.
 सोक्तिक विणा:-याचा तुंबा मोत्यांच्या शिंपल्याचा केलेला असतो.
 सूरबहार:--हा कच्छपी विण्याचाच एक प्रकार आहे. सुमारे साठ वर्षापूर्वी गुलाम महंमदखान नांवाच्या एका गवयाने शोधून काढिला. यांत अलाफ फार चांगले उठवितां येतात.
 त्रितंभी विणा-हाही कच्छपी विण्याचाच प्रकार आहे. याच्यांतील तुंबा थबकडा असून कधीं कधीं लांकडाचा केलेला असतो.
 प्रसरणी विणा--हा विणा कच्छपी विण्यापासूनच अर्वाचीन काळी तयार केलेला आहे. यांत बाजूच्या तारा नसतात. व एक घोड़ी ज्यास्ती असते.