पान:देशी हुन्नर.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २७ ]

कोनाडे वगैरे काढून सुशोभित केलेलीं असतात; या गिलाव्याच्या नक्षींत कधीं कधीं कांचेचे, आरशांचे, अथवा अभ्रकाचे तुकडे बसवितात. आणि त्यांच्यामागें तांब्याचीं, इतर धातूंची किंवा बेगडेचीं झिल दिलेली तवकटें बसवितात. अशा रीतींने तयार केलेलीं तवकटें अंगठीच्या कोंदणाप्रमाणें चकचकावीं हा त्याचा हेतु असतो. हे कांचेचे तुकडे वर्खानीं काढिलेल्या वेलांतून किंवा रंग भरून काढलेल्या झाडांच्या फांद्यांतून फुलांप्रमाणे बसविलेले असतात. कधीं कधीं कांचेचे तुकडे व लहान लहान तसबिरी एक सोडून एक अशा अंतरावर नुसत्या गिलाव्यांत लाविलेल्या असतात. ते कांचेचे तुकडे आंतून कधीं कधीं वाटीसारखे पोकळ असतात. व्हेनीस शहरामध्ये रंगारंगाच्या काचांचे तुकडे खिडक्यांतून बसवून जशीं चित्रें काढितात त्या धरतीवर जयपुरास धातूच्या पत्र्यावर किंवा “प्लास्टर" थरांवर आरपार भोंकें पाडून त्यांच्या मागें रगारंगाच्या कांचाचे तुकडे लावून मखराकरितां तयार केलेल्या कागदाच्या कातरलेल्या चित्राप्रमाणें चित्रें बनवितात.त्यानंतर पहिल्या पत्र्याप्रमाणें किंवा "प्लास्टर" च्या थराप्रमाणें दुसऱ्या एका पत्र्यास भोंकें पाडून तो त्या कांचेच्या मागें बसवितात, आणि नंतर अशी तयार केलेली खिडकी सिमेटाच्या योगानें चाेहाेंकडून बंद करितात. अशा तऱ्हेच्या खिडक्या तयार करण्याचा प्रकार प्राचीन काळापासून आपल्या देशांत चालू आहे असें म्हणतात.

 लांकडाचे लहान लहान तुकडे खोदून ते रंगवून तक्तपोशीवर बारिकसारिक चुकानी मारून त्यांचीच वेलबट्टी काढण्याचीही चाल आहे. पुणें येथील हिरा बागेतींल टाऊनहालाच्या माडीवरील तक्तपोशीस असली नक्षी आहे.

 अर्वाचीन काळीं मुंबई व लाहोर येथील चित्रशाळांतून अभ्यास केलेले विद्यार्थी “प्लास्टर ऑफ् प्यारिस " नांवाच्या एका पदार्थाचे सांचे तयार करून त्यांजवर नक्षीचे "फर्मे" उतरून ते घरें सुशोभित करण्याच्या कामाकडे वापरतात. या धंद्यावर पन्नासपासून दीडशें रुपयापर्यंत दरमहा कमविणार तीन चार असामी हल्लीं मुंबईत आहेत.

बंगाल प्रांतांतील 'चंदी' [चांदणी.? ] मंडप.

 विटांच्या भिंतींची घरें बांधण्याची सुरवात होण्यापूर्वी बंगाल प्रांतांत हरिकीर्तनाकरितां किंवा इतर कामाकरितां सभामंडपासारखे दिवाणखाने केलेले असत. हें काम ५० वर्षांपूर्वी तेथें पाहण्यांत येत असे. असले सभामंडप