पान:देशी हुन्नर.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २६ ]

 ग्वाल्हेरीस दगडावरील खोदींव कामाचे सुरेख नमुने मिळत असतात. सन १८८३ सालीं कलकत्त्यास झालेल्या सर्वराष्ट्रीय प्रदर्शनांत ग्वाल्हेरीहून एक मोठा जंगी दरवाजा पाठविण्यांत आला होता. हाच दरवाजा कलकत्त्याहून पुढें लंडनशहरीं गेला. तो तयार करण्याच्या कामावर मेजर कीथ साहेबाची योजना झाली होती. साहेब महशूर ह्मणतात:--"हें दगडावरील काम आस्ट्रेलिया देशांत पुष्कळ खपेल अशी आमची समजूत आहे. ग्वाल्हेरीस चार आणे रोजावर पाथरवट मिळतो व तेंच काम करण्यास आस्ट्रेलिया देशांत रोज साडेचार रुपये द्यावे लागतात. किरिस्तावांच्या देवळांतून लागणारें 'व्यासपिठादि' कोरींव काम ग्वाल्हेरीस सहज करितां येईल. त्या देशांतील नवीन तयार जहालेल्या 'लॉ-कोर्टात' असलेली नक्षी व या ग्वाल्हेरच्या दरवाजाची नक्षी या दोहींची कोणी तुलना करील तर ग्वाल्हेरींचे काम पुष्कळ सरस आहे, असें त्याचे आढळण्यांत येईल. हा ग्वाल्हेरीचा दगड जसजसा जुना होत जाईल तसतसा हवेंमुळे जास्ती जास्ती कठिण व टिकाऊ होत जातो. शिंदेसरकारच्या या राजधानींत असलें दगडावरील काम करणारे सुमारें एक हजार लोक आहेत व त्यांस सुमारें पंधरापासून साठ रुपयांपर्यंत दरमहा मिळतो. धोलपूर व ग्वाल्हेर या दोन शहरांचे दरम्यान असल्या दगडाच्या चार खाणी आहेत; व हल्लींचे महाराज नुकतेच मरण पावले आहेत, तेव्हां हा मुलुख बिटिश सरकारच्या ताब्यांतच राहणार आहे. अशा वेळीं व्यापारास उत्तेजन आणण्याकरितां कोणत्याही साहलती मिळवून घेण्यास अडचण पडणार नाहीं. या खाणींत कधीं कधीं चाळीस चाळीस फूट लांबीचे चिरे सांपडतात. या संस्थानांत दगड कोरण्याची विद्या प्राचीन काळापासून माहित आहे. परंतु प्राचीन काळाच्या इतर सर्व हुन्नरांप्रमाणे हाही हुन्नर अस्तास जाण्याची भीति आहे."

जयपूर येथील गिलाव्याचें काम.

 जयपूर येथें व इतर कांहीं ठिकाणीं भिंतींवर गिलाव्याचेंकाम करितात तेंही शिल्पशास्त्राच्या संबंधाचें आहे. त्या कामाचे संबंधाने मागील प्रकरणांत कांहीं वर्णन आहे. कधी कधी भिंतीवर व छतांवर गिलाव्याची नक्षी काढून तिजवर अभ्रकाचा रंग चढवितात, त्यामुळें त्यांस मखमालीसारखी तकतकी येते. मुसलमान लोकांचीं किंवा मुसलमानांचें अनुकरण करणाऱ्या लोकांची घरें, गिलाव्यात वेंल, फुलें, सुरुचीं झाडें व निरनिराळ्या आकाराचे लहान लहान