पान:देशी हुन्नर.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २४ ]

इतरं ठिकाणी कोरींव दगडांची देवळें नाहीत असें नाहीं. परंतु ती नाशीक येथील नारोशंकरच्या देवळाप्रमाणें अर्वाचीन काळचींच आहेत असे म्हटलें तरी चालेल. हेमाडपंती देवळें या नांवाने प्रसिद्ध असलेल्या कांहीं जुनाट इमारती ठिकठिकाणीं दृष्टीस पडतात. परंतु त्यांजवर नक्षी फारच थोडकी असते. लंडन शहरांत सन १८८६ सालीं झालेल्या प्रदर्शनांत रेवाकांठासंस्थानांतून 'दगडीच्या दगडाची' एक कोरींव जाळीदार खिडकी पाठविण्यांत आली होती. तशीच भावनगर येथून संगमरवरी दगडाची एक फारच नामी जाळीदार मोठी थोरली दरवाजायेवढी खिडकी पाठविली होती. वायव्येकडील प्रांतांत आग्रा व मिर्जापूर येंथें दगडावरील नक्षीचें काम होतें. अडीच फूट चौरस दगड कोरून केलेल्या जाळीदार कामास आग्रयास १५।१६ रुपये पडतात. ताजमहाल येथील संगमरवरी दगडावरीलं जाळीकामासारखे त्याच दगडाचे जाळीदार नमुने तीस तीसपासून चाळीस चाळीस रुपयांपर्यंत मिळतात.

 या जाळीकामाबद्दल 'जर्नल आफ इंडियन आर्ट' नांवाच्या चित्रयक्त त्रैमासिक पुस्तकांत खालीं लिहिलेला मजकूर प्रसिद्ध झालेला आहे.

 "मोंगल बादशाहीच्या प्रतापशाली संवत्सरापासून ज्याचा उगम अशा संगमरवरी दगडावर व तांबड्या दगडावर केलेल्या जाळीकामाचें वर्णन येथें देणें अवश्य आहे. जाळीकाम झणजे भूमितिशास्त्राच्या आधाराप्रमाणे काढिलेल्या चित्रविचित्र आकाराची दगडाच्या पातळ शिळेवर आरपार कोरलेली नक्षी. या अप्रतिम जाळीकामाच्या खिडक्या व झरोके यांच्या योगानें उत्तराहिंदुस्थानांतील बाधक हवेपासून लोकांचें रक्षण होऊन त्यांस कांचेच्या तावदानांतून घरांत आलेल्या उजेडाप्रमाणें उजेडही प्राप्त होत आहे; इतकेंच नाही, तर प्राणिमात्रास अवश्य असलेली स्वच्छ हवाही त्यांस पुरेशी मिळते. ज्या दगडाच्या जाळ्या करितात, तो रत्नागिरी जिल्ह्यांतील “ दगडीचा दगड " या नावांने प्रसिद्ध असलेल्या पदार्थासारखा आहे. मात्र त्याचा रंग तांबूस असून तो काहींसा जास्ती टणक असतो. या दगडाविषयी अशी म्हण आहे की, 'तो कापण्यास लोण्यासारखा मऊ, व टिकण्यास चामड्यासारखा चिवट आहे.'

 राजपुतान्यांत या दगडावर जी नक्षी काढतात ती झोंकदार व सुरेख असते, व साहेब लोकांच्या दिवाणखान्यांत मांडण्याकरितां त्याच्या कोरींव थाळ्या, डबे इत्यादि सामान करितात. त्यांची इंग्रज लोकांस फार आवड आहे. मेहेरबान कॉनसाहेब यांचें असे म्हणणें आहे कीं, हा दगडांचा दगड घरावर नक्षीचें