पान:देशी हुन्नर.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १७ ]

एका मोठ्या इमारतीचें काम आतां संपत आलेंआहे. या इमारतीस लागणारें नकस काम काढण्याकरितां जेकब साहेबांनी कांहीं कारागीर लोक दिल्ली, फत्तेपूर, शिक्री व इतर प्रसिद्ध शहरीं पाठवून तेथील नकस कामाचे नमुने आणविले, व तें पुढें ठेऊन त्यांजवरून मूळच्या नक्षीची नकल न करितां, तशाच धरतीचे नवीन नमुने तयार करविलें. ही नवीन नक्षी फारच सुबक झाली आहे. अशा रीतीने युरोपियन कामगारांच्या नजरेखालीं शिकून तयार झाल्यामुळें राजपुतान्यांतील कारागीर आपल्या धंद्यांत इतके निपूण झाले आहेत की, त्यांचा हात धरण्याची पृथ्वीवरील कोणत्याही देशांतील पहिल्या प्रतीच्या कारागिरांची सुद्धां छाती होणार नाही. मात्र त्यांस मनुष्यें, पांखरें, व जनावरें यांची चित्रें काढण्यास सांगतां कामानये" राजपुतान्यांत करवली गांवीं जुन्या नक्षीचे नमने दोन रुपयांपासून पुढें विकत मिळतात. नेपाळांतही चित्रकारलोक असलें काम करतात. आग्ऱ्यास काही लोक ताजमहालाचे व इतर जुन्या इमारतीचे लहान लहान नमुने करून विकतात. लखनौ आणि मिरझापर येथेंही असल्या प्रकारचे दगडाचे नमुने विकत मिळतात. बंगाल्यासारख्या शुष्क प्रांतांत सुद्धां, म्हणजे जेथें दगडी काम आफ्रिकेंतील साहारा येथील मैदानांत सांपडणाऱ्या झऱ्या सारखे दुर्मिळ आहे, तेथें सुद्धां सासेरम या गांवीं असलेल्या शीरशाहाच्या मशीदीचे नमुने विकत मिळतात. पंजाबांत नभा संस्थानांत व इतर पुष्कळ ठिकाणीं असले नमुने तयार करून साहेबलोकांस विकून त्यांजवर पैसा मिळविणारे पुष्कळ लोक आहेत. आमच्या मुंबई इलाख्यांत हें काम फारसें कोणीं करीत नाही. ठाणे जिल्ह्यांत कल्याण तालुक्यांत असलेलें अंबरनाथ येथील देऊळ, कानेरी, वेरूळ, व घारापुरी येथील लेणीं, पुण्यांतील काही देवळें, नाशीक येथील देवळेंं व वाडे, अमदाबादेंंतील मशीदी व मनोरे, यांचे दगडी किंवा लांकडी नमुने करून विकण्याचा कोणीं धंदा काढील तर त्यास पैसा मिळेल यांत काही शंका नाही. जयपूर येथे कोणताही वाडा बांधणेंं झालेंं तर त्याचा मातीचा नमुना अगोदर करीत असत. तोच आलीकडे प्ल्यास्टर आफ प्यारीसचा करूं लागले आहेत. चांगल्या चांगल्या इमारतींचे पितळेचे लहान लहान नमुने करून विकतात. हा धंदा पुण्यास कोणी काढील तर बरें होईल.

शिल्प कलेसंबंधीं चित्ररेखन.

 या संबंधाची कांहीं माहिती मागें आलीच आहे. घरावर चित्रें काढण्याचें