पान:देशी हुन्नर.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २०७ ]

 मद्रास इलाख्यांत मच्छलीपट्टण, मलबार, व कोकोनाडा या गांवीं पूर्वी गालिचे होत असत, व ते इराण वगैरे देशांतील गालिच्यांच्या धरतीवर नसून वेगळ्याच प्रकारचें होते. सर जॉर्ज बर्डवुड् यांचें असें म्हणणें आहे कीं या तीन गांवीं गालीचे विणण्याची सुरवात फार प्राचीनकाळीं झाली असावी. इतकेंच नाहीं नर ती विद्या या ठिकाणीं देशीक [ देशांत उत्पन्न झालेलींच ] असली पाहिजे, कारण परदेशांतून आलेल्या प्रकारापेक्षां तीं अगदीं भिन्न प्रकारची आहे.
 हल्लीं मद्रास इलाख्यांत कृष्णा, वृडचेलम, अडोनी वडवेदी, करनूल, भाव्वीव, लाजा, एलो, राजमेहेंद्री, मच्छलीपट्टण, आणि अयंपठे या गांवीं गालीचे तयार होतात.
 ह्मैसूरप्रांतीं मंगलोरास पूर्वी चांगले गालीचे होत असत. हे दोन्ही बाजूंनीं सारखे दिसत ह्मणजे त्यांस उलटी सुलटी बाजू नव्हती. कांहीं तुरंगांत रेशमी गालीचे होत असतात.

 सत्रंज्यामुंबई इलाक्यांत सिंध प्रांतांतील व्यूबाकशहर, अहमदनगर, खंबायत व नवलगुंड या गांवांची सत्रंज्याबद्दल पूर्वी मोठी प्रसिद्धी होती. अलीकडे संत्रज्या तुरुंगांत होऊं लागल्यामुळें हा धंदा अगदीं बुडाला आहे.
 गया, भाभूआ, चंपारण ,व बेहात, या बंगाल प्रांतांतील गांवीं सत्रंज्या होतात तत्रापी वायव्य प्रांतांतील आग्रा व अल्लीगड या गांवासारखे काम दुसरे कोठें होत नाहीं, बरेली, बुलंद शहर, जयपूर, बेळगांव, धारवाड, इत्यादि ठिकाणीं मधून मधून सत्रंज्या तयार होत असतात.
 आमदाबाद येथील तुरंगात व मिरझापूर येथें लोकरिच्या गालिच्या प्रमाणें विणलेले सुती गालिचे आलिकडे तयार होऊं लागले आहेत.
 पुणें किंवा मुंबई शहरीं गालिचे विणण्याचा कारखाना कोणी व्यापारी काढितील तर त्यास पुष्कळ फायदा होईल यांत संशय नाही. आमदाबादेस शेट मगनभाई हट्टीसिंग यांनी चार वर्षांपूर्वी असला एक कारखाना काढला आहे, तेथें तयार झालेले गालिचे अमेरिकेंत जात असतात.

समाप्त.