पान:देशी हुन्नर.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १४ ]

ह्मदेशांतील लोक फार कुशल आहेत, असें कित्येक साहेबलोक सुद्धां कबूल करितात. जयपूर येथें असले कागदाचे मुखवटे करून वराह, नृसिंह अवतारांची सोंगे आणण्याची चाल आहे. बांबूच्या ताटीवर कापड किंवा कातडी लावून हत्ती व उंट तयार करतात. व त्यांजवर बसल्यासारखे करून ते गांवांत फिरवितात.

 पुणें येथें मोहरमचे समारंभांत गर्दीचे ठिकाणाहून अशा प्रकारचा घोडा फिरतांना पाहिल्याचे स्मरण पुष्कळांस असेल. मुखवटे, फटवे घोडे, हत्ती वगैरे चित्रांखेरीज कातड्याचे तुकडे व रंगी बेरंगी छिटे वगैरेची पाखरें, साप इत्यादी जिनसा जयपूर येथें मोठ्या टुमदार करतात. काहीं दिवसांपूर्वी या शहरांत चिंध्यांचे राघू, हत्ती वगैरे होऊ लागले होते, परंतु आलीकडे ते कोठे फारसे आढळत नाहींत. जयपूरच्या असल्या चित्रांचे देखील रंगित काम चांगलें असतें.


प्रकरण २ रें.
नकसकाम.

 या देशांतील बरेंंच काम या सदराखालीं येईल . “डेकोरेटिव्ह आर्ट " म्हणजे चैनीचे नक्षीदार पदार्थ तयार करण्यास लागणारें कौशल्य. अशा रींतींने तयार केलेल्या पदार्थास आम्ही नकसकाम असे ह्मणतों.
 या प्रकारच्या सर्व कामांबद्दल आमचे लोकांस एक मोठी महत्वाची गोष्ट सांगणे अवश्य आहे. ती ही कींं, अशा प्रकारचें काम तयार करते वेळींं तयार झालेला माल कोणत्या लोकांत खपणारा आहे याचेंं धोरण पक्कें लक्षांत ठेवलें पाहिजे. ज्या लोकांचे हाती पैसा खेळत असेल, त्या लोकांची आवडनावड कारागिरांचे लक्षात येईल, तर त्यांच्या मालाचे पैसे ताबडतोब उभे राहण्यास काडी इतकी अडचण पडत नाहीं. लोकांच्या आवड नावडीचा कल जिकडे असेल तिकडे कारागिराच्या कसबाने ओढ घेतली नाहीं, तर दोन पैसे मिळून कारागीर लोकांची स्थिति सुधारण्याची बिलकुल आशा नाही. लोकांचे मनाचा कल ज्या कारागिरांस चांगला समजेल त्यांस नवा नवा व तऱ्हेतऱ्हेचा माल उत्पन्न करून आपल्या धंद्यास नेहेमी तेजी राखतां येते व आपल्या कर्तबगारीनें तो