पान:देशी हुन्नर.pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०१ ]

णजे चौकटींत कापड बसऊन त्याजवर केलेलें काम. त्याचें ५ पांच प्रकार आहेत. एककसभूटिकी, दुसरा झिकचलक, तिसरा भरतकराची, चवथा झिट्टिकी, व पांचवा चलकटिकी.

 कशिदाकाढिताना खिळ्यांनीं, लाकडाच्या ठशानीं, किंवा कागदाच्या " स्टेनसिलानीं " नक्षीछापून तिजवर काम करावे लागते. सुरतेस दरसाल ७००० पासून १०००० पर्यंत रुपयांचें काम होतें.

 सांवतवाडीचें कशिदाकाढणारे लोक जातीचे जिनगर आहेत. मुंबईस दिलीचें मुसनमान व गोव्याचें किरिस्ताव लोक हेही कशिद्याचें काम करितात.

 पंजाबांत कशिद्याचें काम पुष्कळ होतें. दिल्लीस टेबल क्लॉथ वगैरे काम तयार होतें व अमृतसर आणि लुधियाना येथें मुख्यत्वें लोकरीच्या चोळ्यावर कशिदा काढतात. दिल्लीस सिंध हैद्राबादेप्रमाणें कारचोबी काम पुष्कळ होतें.

 काश्मिरांतील शालीवर कशीद्याचें काम होतें तसलें बारिक काम दुसरें कोठेंही होत नसेल. काश्मिराशिवाय अमृतसर, लुधियाना, नूरपूर, गुरदासपूर, सियालकोट व इतर पुष्कळ ठिकाणीं अलीकडे शाली होऊं लागल्या आहेत. काश्मिरांतील शाली तयार करणारे लोक, स्वदेशीं पोट भरेना ह्मणून या व इतर गांवीं जाऊन राहिले आहेत.

 काश्मिरांत दोन प्रकारच्या शालीं तयार होतात. एका प्रकारास 'तिलावाला', 'तिलीका' , ' 'कानीका, ' व 'बनावट,' अशीं नावें आहेत. हा प्रकार किनखाबाप्रमाणें मागावर विणिला जातो. दुसऱ्यां प्रकारास 'अम्लीकल,' असें नांव आहे. यांत शाल साधी असून तिजवर कशिद्याची नक्षी काढिलेली असते. पहिल्या प्रतीची ह्मणजे 'बनावट ' शाल किनखाबाप्रमाणें मागावर विणावयास लागते. शालीचे तीन प्रकार आहेत. एक दुशाला ह्मणजे शालजोडी, दुसरा रुमाल, हा चौकोनी असतो. तिसरा, ' जमीवा' यांत हिरवा आणि पांढरा, तांबडा आणि निळा किंवा इतर कोणत्या तरी निरनिराळ्या रंगांचें दोन रुंद रुंद पटे असतात. काश्मिर देशांतून १८८० सालीं २१५०००० रुपयांच्या शाली बाहेर गेल्या. १८८१ साली १०८८००० रुपयांचा माल बाहेर गेला, व १८८२ सालीं ११३१००० रुपयांचा माल बाहेर गेळा. अलीकडे विलायती रंग वापरूं लागल्यामुळें, मालाची खराबी होऊं लागली आहे. अमृतसर येथें शाली होऊं लागल्या आहेत परंतु त्या गांवीं उत्तम प्रकारची लोकर मिळत नाहीं