पान:देशी हुन्नर.pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०० ]

ध्यें कशिद्याचें काम पुष्कळ करितात तरी व्यापारां करितां जो माल तयार होतों तो बहुतकरून पुरुषांच्याच हातचा असतो. शिकारपुरास हल्लीं सुमारे ४० पासून ५० लोक हे काम करीत आहेत त्यांस 'चिकन दोज' किंवा 'कुंदीदोज' असें ह्मणतात. ते हल्लीं मुसलमान आहेत. परंतु मुसलमान होण्यापूर्वी जातीचे भाटे होते. व अजूनही आपआपसांत लग्न व्यवहार आह्मां हिंदु लोकांप्रमाणेंच स्वजातियाशींच करितात. इतर मुसनमानाप्रमाणें वर्ण संकर होऊ देत नाहींत. सिंध प्रांतांतील अमीर उमराव नाहिसें झाल्यापासून आपला धंदा बसत चालला आहे असें या लोकांचें ह्मणणें आहे. हल्लीं काम साहेब लोकांकरितां मात्र तयार होतें. विलायती सखलाद घेऊन तिजवर बुखारा येथील रेशमानें कशिदा काढितात. कराची, हैद्राबाद, व शिकारपूर या गांवीं बुखाऱ्याचे कच्चे रेशीम कांतून त्यावर पक्का रंग देतात. हल्लीं सपाता, मडमांचे कबजे, टेबल क्लॉथ, तक्के, उशा, गिरया, यांची अस्तरें इत्यादि पदार्थास गिऱ्हाइकी ज्यास्त आहे. या कशिदा काढणारांच्या बायका घरचें कपडे शिवितात. शिकारापुराजवळ रौहरी ह्मणून एक गांव आहे. तेथेंही असलें काम होतें. सिंध हैद्राबादेस कारचोवी काम होतें. तें करण्याकरितां कलाबतू लागतो ते सिंधी लोक काबूल, ब्याक्ट्रीया व आग्रा येथून आणवितात.

 सुरतेस कशिदा काढणारे सुमारे ६०० पासून ७०० मुसलमान लोक आहेत. ते आठ आण्यापासून दीड रुपया रोजीवर काम करितात. कलाबतू सुरतेसच तयार होते, रेशीम मात्र मुंबईहून न्यावें लागतें. कलाबतूस जें रेशीम लागतें त्यास आसारा ह्मणतात व कलाबतूचें काम शिवण्यास, जें बारीक रेशीम लागतें त्यास 'नख' ह्मणतात.

 आसारा ह्मणजे असारी नामक हत्यारावर कातलेलें रेशीम व नख ह्मणजे नखांस बारीक भोकें पाडून त्यांतून कांतून काढिलेले रेशीम. नखावरील बारीक रेशीम हल्लीं निघत नाहीं त्याचें नांव मात्र शेष राहिलें आहे. सुरतेंत च्यार प्रकारचा कशिदा काढितात. १ हातजरी, २ कारचोबी, ३ वादलानी, व ४ रेशमी भरतकाम. यांत कारचोबी व बादलानी काम करणें असेल तर कापड पहिल्यानें चौकटीवर बसवावें लागतें. सुरतेंतील रेशमीकशिदा काढणाऱ्या लोकांसहीं सिंधदेशांतील कशिदा काढणाराप्रमाणें " चिकनदाजे" हेंच नांव आहे. बादलानी ह्मणजे काय हे वरसांगितलेंच आहे. कारचोबी ह्म-