पान:देशी हुन्नर.pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९९ ]

सांवतवाडी या गांवीं व्यापाराकरितां कशिद्याचें काम तयार होतें. घरांत स्वतःच्या चोळीवर किंवा साडीवर मुलींनीं किंवा बायकांनीं काढलेला कशिदा येथें आम्ही हिशोबांत धरीत नाहीं, कशिदा रेशमाचा असतो, किंवा जरीचा असतो, व तो सुती कापडावर काढितात तसा रेशमी कापडावरही काढितात. जरीच्या कलाबतूंत टिकल्या वगैरे बसवून जो कशिदा काढितात त्यास 'भरतकाम ' म्हणतात.

 शिकारपुरास रेशमी कशिदा फार चांगला होतो, हैद्राबादेस, सुरतेस व मुंबईस 'कारचोबी' ( भरतकाम अथवा जरीचे काम ) चांगलें होतें. कच्छ प्रांती रेशमी कशिदा फार चांगला होतो खरा, पण अलीकडे विलायती रंगाचा प्रसार फार झाल्यामुळें तेथील काम साहेब लोकांस नापसंत पडूं लागलें आहे. सुरतेस भरतकाम पुष्कळ होतें, याशिवाय बादलानी ह्मणून कशिद्याचा एक प्रकार आहे तो बोहरी लोकांच्या बायकांस विशेष माहीत आहे. कलाबतू तयार करितांना चांदीची बारीक तार करून ती ठोकून चपटी करावी लागतें. अशा चपट्या केलेल्या तारेस 'बादल' ह्मणतात. ही तार घेऊन तिनेंच जाळीच्या कपडयावर कशिदा काढून ते कापड आपल्या बुरख्यास असलेल्या डोळ्यासमोरील भोंकास लावण्याची बोहरीलोकांत चाल आहे.

 कच्छ देशांतील रबारी लोकांच्या बायका खारव्यावर कशिदा काढून त्यांत मधून मधून कांचेचें तुकडे बसवून त्याच्या चोळ्या व घागरे करितात. खानदेशांत वणजारी लोकांच्या बायकांही असेंच काम तयार करितात. पांढरपेशांतील कुलस्त्रियां आपल्या चोळ्यांवर व कधीं कधीं साडीच्या पदरावर कशिदा काढितात. गुजराथी व पारशी लोकांत साडीच्या काठावर कशिदा काढण्याची सर्वत्र चाल असे परंतु अलिकडे ती बंद होत चालली आहे.

 पश्चिम हिंदुस्थानांतील पुरुषांत काठेअवाड, कच्छ, गुजराथ, व मुंबई येथील मेमाणलोक कशिद्याचे कापड ज्यास्ती वापरितात. त्यांच्या खालोखाल सुरत वगैरे गांवच्या मुसलमानलोकांस कशिद्याच्या कपड्याची आवड आहे. आमच्या महाराष्ट्रदेशांत कशिद्याचे बटवे व चंच्या पूर्वी वापरीत असत परंतु त्यांही बहुतेक; नाहिशा होत आल्या आहेत. अंगरख्याच्या कंठीवर मात्र कोठें कोठें कशिदा दृष्टीस पडतो. प्रस्तूतकाळीं कशिद्याचें काम साहेब लोकांतच पुष्कळ खपतें. कच्छ व गुजराथ प्रांतीं, बायकाम-