पान:देशी हुन्नर.pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९८ ]

व येवला या गांवीं बुट्टीचे शालू व खण होतात. तेंहीं जरीकपड्यांतच गणले पाहिजेत. उत्तरेकडे मुर्शिदाबाद, बनारस, भावलपूर, मुलतान वगैरे ठिकाणींही किनखाबविणणारे कारागीर आहेत. सुरतसे जरीचे हिमरूं ह्मणून एक कापड तयार होत असतें त्यास सायाम देशांतील राजे रजवाड्यांत पुष्कळ खप आहे. पंजाबांतील लुंगी, मुंबई इलाख्यांतील मंदील व मद्रास कडील रुमाल या कपड्यांतही कलाबतूचा उपयोग करितात. पूर्वी आपल्या देशाचें राजे रजवाडे लोक किनखाबी अंगरखे घालीत असत, किनखाबी गाद्यांवर निजत असत, किनखाबी गिरद्या व उशा वापरीत असत, व घोड्याच्या खोगिरावर किनखाबाचा गाशा टाकीत असत, त्यामुळें हा धंदा चालला होता. अलीकडे तसे वापरणारे राहिले नाहींत व इंग्रजी शिकलेल्या श्रीमंत लोकांस जरीचे कपडे वापरणें ही गोष्ट पसंत नाही, यामुळें धंदा बसत चालला आहे. तरी अजूनही अमदाबाद, सुरत व बनारस या गांवीं जें काम होतें तें पहाण्यासारखें आहे. अमदाबादेस अजून ७०० । ८०० माग आहेत. शेट चुनीलाल फत्तेचंद हे अमदाबाद येथील प्रसिद्ध व्यापारी कलकत्ता व पुणें प्रदर्शनांत आपला पुष्कळ माल घेऊन गेले होते. सुरतेंत हाजी अल्लीभाई ताजभाई यांचें दुकान प्रसिद्ध आहे. बनारसेस बलभद्रदास नावाचा एक मोठा प्रसिद्ध व्यापारी आहे. श्रीमंत सयाजीराव महाराज सेनाखासखेल समसेरबहादर यांनीं युवराज प्रिन्स आफ वेल्स बडोद्यास आले होते तेव्हां यास एक अमदाबादचा गालीचा बक्षीस केला आहे त्याची सर जॉर्ज बर्डवूड साहेब फारच तारीफ करितात. अमदाबादेस 'खंड ' ह्मणून एका प्रकारचें किनखाबापेक्षां पातळ असें जरीचें कापड निघत असतें. तसच सुरतेस किनखाबा सारखे जाड परंतु त्यांत कलाबतू शिवाय रंगारंगाच्या रेशमाचीही नक्षी विणलेली असते असें एका प्रकारचें कापड काढितात त्यास 'जरीदाणो' असें नांव आहे. औरंगाबादेस उत्तम प्रकारचा किनखाब अजून तयार होत असतो.

कशिदा.

 शालूसारख्या बुट्टीदार कापडास त्रैलोक्यनाथ बाबू कशिदा ह्मणतात ही त्यांची चूक आहे. कशिदा ह्मणजे विणलेल्या आयत्या कापडावर सुई, धागा, घेऊन हातानें काढिलेली नक्षी.

 मुंबई इलाख्यांत मुख्यत्व शिकारपूर, सिंधहैद्राबाद, कराची, कच्छ, सुरत, व