पान:देशी हुन्नर.pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९७ ]

 काश्मीर प्रांतीं लोकर रंगवितात.

तुई, फीत, किनार व पदर.

 कलाबतू कशी करतात हें मागे सांगितलेंच आहे. बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी यांचें असें ह्मणणे आहे कीं तुई आणि फीत हे पदार्थ आमच्या लोकांस माहीत नव्हते. परंतु या कामीं त्यांची कांहीं तरी गैरसमजूत झाली असावी असें आम्हांस वाटते.

 हिंदुस्थानांतील, निदान पश्चिम हिंदुस्थानांतील स्त्रियांस तरी आपल्या चोळीस लावावयाची तुई शेकडों वर्षे माहित आहे यांत कांहीं शंका नाहीं. ही कलाबतूच्या तुईची गोष्ट झाली. मडमांच्या झग्यास व बंड्यास लावण्याकरितां हालंड, बेलजीअम व फ्रान्स देशांत तयार होत असलेली रेशमी तुई मात्र आमच्या लोकांस माहित नाहीं. असली तुई विणण्याची हिंदुस्थान देशांत सुरुवात करून, तो धंदा उंचवर्णांतील विधवास्त्रियांस शिकवून त्यांच्या हातानें देशाचा व्यापार वाढण्याविषयीं यत्न करावा असें त्रैलोक्यनाथ बाबूचें ह्मणणे आहे.

 लष्करीखात्यांत लागणारे कलाबतूचे बुतांव, गोफ, गुंड्या, वगैरे पदार्थ सुरत, दिल्ली, आग्रा, व लखनौ, या ठिकाणी होऊं लागले आहेत. गोटा, किनार, पल्लव ( पदर ) इत्यादिक जिनसाही सुरतेस होतात. डाका, मुर्शिदाबाद, पाटणा बनारस, लखनौ, आग्रा, दिल्ली, लाहोर, जयपूर बऱ्हाणपूर, सिंधहैद्राबाद, दक्षिणहैद्राबाद, औरंगाबाद, अमदाबाद, या सर्व ठिकाणीं जरतारीचें काम होत असतें. पुण्यास कलाबतू तयार करणारे कारागीर पुष्कळ आहेत. आग्र्यास कलाबतूचें काम पुष्कळ वर्षे होत आलें आहे.

 चोळीस लावण्याकरितां जरीचे कांठ अमदाबाद व सुरत या गांवीं पुष्कळ होतात. त्यांत कोर, किनार, तास, लप्पोफीत, व पल्लव असे पुष्कळ प्रकार आहेत. कलकत्ता येथील प्रदर्शनाकरितां अमदाबाद व सुरत या दोन गांवांतून सुमारें २००।२५० कांठांचे नमुने पाठविण्यांत आलें होतें. पुण्यास ‘शिकारखानी ' ह्मणून एक जरीकाठाचा प्रकार तयार होतो.

किनखाब हिमरूं जरीदाणो व इतर जरीचे कापड.

 किनखाब मुंबई इलाख्यांत अमदाबाद व सुरत यागांवीं होतो. याशिवाय पुणें
   २६