पान:देशी हुन्नर.pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९२ ]

टाकून उकळवावें. उकळवितांना वरती फेंस येतो तो काढून टाकावा, व त्यांत आंबोशीचा काढा टाकावा, व नंतर रेशीम आंत टाकून उकळवावें. जितका रंग लालीवर आणणें असेल तितकें आंबोशीचे पाणी आंत टाकावें. हवा तितका रंग चढल्यावर रेशमासुद्धां भांडें खालीं उतरून निवूं द्यावें, व नंतर काढून धुवून सुखवावें.

 पतंगाचा तांबडा रंगहिंदुस्थानीभाषेंत एका दोहोऱ्यांत ह्मटलें आहे "रंग तो पतंग रंग कलही उडजावेगा आणि अशीच ह्या रंगाची स्थिति आहे, तथापि तो तयार करणें असेल तर पापडखाराच्या, साबूच्या, व फटकीच्या पाण्यांत मागें सांगितल्याप्रमाणें बुडविलेलें रेशीम पतंगांच्या लाकडाच्या गाळलेल्या काढ्यांत उकळवून पिळून धुवून सुखवावें.

लोंकरी वरील रंग.

 मुंबईत कांहीं रफुगार लोक लोंकरीवर रंग देतात. परंतु लोंकरीचीं वस्त्रें मुंबई इलाख्यांत फारशी होत नसल्यामुळें लोकरीवर रंग देणारे स्वतंत्र रंगारी लोक पश्चिम हिंदुस्थानांत नाहींत.

 किरमिजी दाण्याचा तांबडा रंगसाबू, पापडखार व चुना या तिहींच्या पाण्यांत लोंकरीचा कपडा भिजत ठेवितात. चुना आणि पापडखार एकत्र करून तो पाण्यांत पुष्कळ वेळ उकळवून त्याजवरील निवळी काढून घेतात, व तींत साबू कालवितात. या पाण्यांत एक रात्र भिजल्यावर लोंकर धुवून सुखवितात. नंतर एक रात्र फटकाीच्या पाण्यांत भिजत ठेवितात. दुसरीकडे नवसागर, फटकी, व सोमल, हीं एका काचेच्या वक यंत्रांत (रिटार्ट) घालून त्यास आंच देऊन त्याच्या वाफेपासून निघणारें दारू प्रमाणें पाणी पुन्हा तयार करून ठेवितात. त्या पाण्यांस तेजाब असें नांव आहे. व त्यांत हैड्रोक्लोरिक आसिड व सोमल यांचें मिश्रण असतें. एका भांड्यांत पाणी घालून त्यांत थोडें तेजाब ओतून त्यांत किरमिजी दाण्याची पूड टाकून तें उकळवितात; व त्यास कढ येत आहे तोंच फटकीच्या पाण्यात बुडावलेला कपडा आंत टाकून लवकर लवकर उलटा सुलटा करून तीन मिनिटांच्या आंत काढून घेतात, व धुवून सुखवितात. हा तांबडा रंग पक्का होतो.

 बैंगणी रंगसाबू, पापडखार व चुना यांच्या वर सांगितलेल्या पाण्यांत कपडा भिजत ठेवून धुवून सुखवून पुन: फटकीच्या पाण्यात भिजत ठेवून