पान:देशी हुन्नर.pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९१ ]

पाणी तयार करून ठेवलेलेंच असतें त्यांत हरड्याच्या पाण्याची पुटें दिलेलें रेशीम बुडविलें ह्मणजे लागलेंच काळेंभोर होतें. मग तें धुवून सुकवावें.

 भुरकट काळापापडखाराच्या व साबूच्या पाण्यांत शिजविलेलें रेशीम हरड्याच्या काढयांत बुडवून हिराकसाच्या पाण्यांत एक रात्र ठेवावें. दूसऱ्या दिवशीं सकाळीं पिळून त्याजवर खोबरेल तेल शिंपडून खुप चोळावें. नंतर हिराकसाच्या पाण्यात घालून पुनः उकळवावें व त्याच पाण्यांत निवूं द्यावें. नंतर काढून धुवावें.

 'गलीमो 'काळोवर किरमिज दाण्यांचा व तांबडा रंग सांगितला आहे, तसा रंग देऊन रेशीम तयार झालें म्हणजे ओलें आहे तोंच गळीच्या पिंपांत बुडवावें ह्मणजे जांभळें होतें. या जांभळ्या रंगाचा काळा रंग करणें असेल तर तें धुवून त्यास हरड्याच्या पाण्याचें एक पूट द्यावें. व हिराकसाच्या पाण्यांत बुडवून काढावें. आणि धुतल्यावर फटकीच्या पाण्यात बुडवून धुवून सुखवावें.

 निळा रंगपापडखाराच्या व साबूच्या पाण्यांत शिजवलेलें व फटकीच्या पाण्यात भिजविलेलें रेशमी कापड गुळीच्या पिंपांत बुडवावें व धुतल्या शिवाय सुखवावें.

 लाखेचा तांबडा रंगसुमारें साठ सत्तर वर्षांपूर्वी रेशमावर तांबडा रंग देण्याकडे लाखेचा पुष्कळ उपयोग होत असे. कारण त्यावेळीं एक रत्तल किरमिज दाण्यांची किंमत चाळीस रुपये होती, हल्लीं तो रुपया दीडरुपया रत्तल मिळतो, किरमिज दाणा असा स्वस्ता मिळूं लागल्यामुळें, व त्याजपासून रंगही चांगला तयार होत असल्यामुळें, लोकांस 'लाक्षारसाचा' विसर पडला. व हल्लीं तर लाखेचा रंग देण्याची कृति सुद्धां बहुतेक रंगाऱ्यांस माहीत नाहीं; कारण त्यांचे आजे पणजे हा रंग टाकून देऊन किरमिज (Cochineal ) कीटकाचा रंगांत उपयोग करूं लागले, व त्यांनीं आपल्या मुलांबाळांस लाखेच्या रंगाची कृति शिकविली नाहीं.

 लाक्षारस तयार करण्यास पावणे दोन रत्तल कच्ची लाख व पांच तोळे 'फुलियोखार' एकत्र करून ती भिजे इतकें पाणी तिजवर ओतून झांकून ठेवावी. दुसऱ्या दिवशीं सकाळीं आंतील लाख पाण्यानें खूप कुसकरावी. ह्मणजे तिचा रंग पाण्यांत निघून येतो. हें पाणी फडक्यानें गाळून घेऊन त्यांत लोध्राची पुड