पान:देशी हुन्नर.pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८६ ]

ठाल्या ठिपक्यांस कधीं कधीं थोडा रंग मधून मधून लागलेला असतो. आणि त्यांच्या मध्यभागीं एक काळा बिंदु असतो. बांधणीनें रंगविलेल्या कापडासारखें विलायती यंत्रावर छापलेलें कापड बाजारांत पुष्कळ मिळतें.

 कापडास रंगविण्यापूर्वी गांठी मारणारांस 'बंधारा' ह्मणतात. व तें रंगवणारास गुजराथेंत 'रंगरेज' झणतात.

 यावरून बांधणीच्या कामाचे दोन भाग आहेत, हें वाचकांच्या लक्षात आलेंच असेल.

  १ गांठी मारणें ह्मणजे बांधणी.  २ रंगविणें

 बांधणी--गांठी पांढऱ्या किंवा पूर्वी रंगविलेल्या कापडास मारितात. कपड्यावर पहिल्यानें गेरुवे पाणी एकत्र करून त्यानें आडव्या उभ्या रेघा छापून लहान मोठ्या चौकटी वठवतात. गाठी मारणारास उजव्या हाताच्या आंगठ्याची व तर्जनीचीं नखें वाढवावीं लागतात; व डाव्या हाताचा आंगठा, तर्जनी, व मध्यमा या तीन बोटाची नखें वाढवावी लागतात. नक्षी बारीक किंवा मोठी काढणें असेल त्या मानानें बारीक किंवा जाड्या सुताची त्यास गरज लागते. ज्याठिकाणीं ठिपका काढणें असेल त्याठिकाणीं कापडास डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या वाढविलेल्या नखानें खोबळी करून ती त्याच हाताच्या आंगठ्याच्या व तर्जनीच्या नखानें पकडून तिजवर उजव्या हाताच्या आंगठ्याच्या नखांत पकडलेल्या धाग्यानें एकावर एक पुष्कळ वेढे घेऊन बांधावे. याप्रमाणें तीन फूट चौरस कपड्यास साधारण गांठी मारणें आहे तर बारा तास लागतात. त्याच बारीक गाठी मारणें आहे तर बारा तासांत फक्त एक फूट चौरस काम होते. एका 'बंधारास ' एका दिवसांत सुमारें चार आणे मजुरी पडते. मोठ्या कपड्यावर काम करणे असेल तर तो दुमडून ह्मणजे दुहेरी करून त्यास गांठी मारतो. त्यामुळें निमे मेहेनत वांचते. सहा वार लांब व सवावार रुंद बांधणीचें काम केलेल्या रेशमी सडीस १०० रुपये किंमत पडते.

 रंगविणे--गांठी मारून कापड तयार झालें ह्मणजे रंगाऱ्याकडे जातें. तें काळें करणें असेल तर रेशमी कापडास पहिल्यानें किरमिज दाण्याचा तांबडा रंग द्यावा लागतो. सुतानें बांधलेली जागा पांढरीच राहून पांढरे ठिपके दिसावे अशी असेल तर तें एकदाच रंगविलें तरी चालते. परंतु ठिपक्यांवर तांबूस रंगाचा छटा मारावा अशी इच्छा असेल तर बांधणीचें सूत भिजवून, त्यांतून