पान:देशी हुन्नर.pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८५ ]

न त्यास फिक्का निळा रंग द्यावा. यानंतर तेंच कापड पाण्यांत दोन तास भिजत टाकून त्याजवरील लांकडाचा भुसा व गोंदाचें पाणी धुवून टाकावें. नंतर तें पुनः पुनः धुवून साफ करावें. दुसरीकडे 'कोचा' हळद अडीचशेर व चुना तीनशेर, घेऊन १२० ग्यालन थंडपाण्यांत ' मिसळावा' व त्यांत सदरील कापडाचा पिळा बुडवून हातानें कालवावा. कापड बाहेर काढून तसें दुसरें पिंवळें पाणी तयार करून त्यांत भिजत ठेवावें. ह्मणजे कापडावरील निळा रंग हिरवा होतो. गोंदाने छापून धुवून काढलेल्या पांढऱ्या जाग्यावर पिवळा रंग वठतो. अखेरीस कापड फटकीच्या पाण्यात बुडवावें. ह्मणजे त्यांतील पिवळा व तांबडा रंग जास्ती खुलूं लागतो, व पक्का होतो.

 अखेरीस कापड धुवून पिळून ओलें आहे तोंच त्याजवर गोंदाचें पाणी चढवून सुखवून त्याजवर कुंदी करावी. असल्या कापडास गुजराथेंत 'बंगाला ' म्हणतात.

 'कायो' रंगावर तांबडी नक्षी--कच्छी लोकांच्या बायकांची बहुतकरून लुगडीं अशीच असतात. सुरंगीचा रंग देतांना हरडा चढविण्यास पहिल्यापासून जी कृति करावी लागते त्याच कृतीनें कापडावर हरडा चढवून एक भाग मेण, व दोन भाग खिखणेल एकत्र वितळववून त्यानें कापड छापतात व त्याजवर मागें वर्णन केल्याप्रमाणें काळा रंग देऊन मेण व खिखणेल काढून टाकण्याकरितां पाण्यात उकळवावें; आणि मग तेंच कापड खटकीं व लोध्र यांच्या पाण्यात बुडवून सुखवून मंजिष्टाच्या किंवा सुरंगीं रंगाच्या भट्टींत उकळवून काढावें.

बांधणी काम.

 हें काम दुरून छापाच्या कामासारखें दिसतें. गुजराथ, कच्छ, सिंध, काठ्यावाड, आणि मुंबई इतक्या ठिकाणीं असलें काम करितात. बांधणीनें रंगविलेलें कपडे गुजराथी व पारशी स्त्रिया वापरतात. सुती व रेशमी या दोन्ही प्रकारच्या कापडांत बांधणीकाम करण्याची वहिवाट आहे. बांधणीकामांत मागें सांगितल्याप्रमाणें कधीं बारीक वलयाकार ठिपक्याच्याओळीनें काढलेली नक्षी असते व कधी मोहरी पासून तों अधेलीपर्यत आकाराचे नुसते ठिपके असतात. मो-


* बाभळीचा गोंद एक भार, चुना एकमण आणि पाणी अडीच मण, एवढ्याचें मिश्रण " लांग क्लाथच्या " वीस ताग्यांस पुरतें.